AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुधाचे हे पांग फेडले, आईचा मृतदेह तीन दिवस खंडव्यात अंत्यसंस्काराविनाच, यवतमाळचा मुलगा म्हणतो-माझ्याकडे वेळ नाही

वेळ नसल्याचे कारण दे मुलगा अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई करीत आहे. तर परिवारातील इतर सदस्यांकडे अंत्यदर्शनाला येण्यासाठीही वेळ नाहीये. ही महिला महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीची रहिवासी असून, तिचे नाव पुष्पा असे आहे.

दुधाचे हे पांग फेडले, आईचा मृतदेह तीन दिवस खंडव्यात अंत्यसंस्काराविनाच, यवतमाळचा मुलगा म्हणतो-माझ्याकडे वेळ नाही
Khandva mother deadbody waiting for funeralImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 2:09 PM
Share

खंडवा – एका महिलेचा (Mother dead body)मृतदेह तीन दिवस शवागरात (three days waiting for funeral)अंत्यसंस्काराची वाट पाहत आहे, या महिलेच्या नशिबी मुलाच्या हातून मुखाग्नी तर सोडाच, पण कुटुंबाकडून किमान अत्यंदर्शनासाठीही कुणी आलेले नाही. पोलीस (Madhya Pradesh Police)चार दिवसांपासून या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी सातत्याने मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना फोन करीत आहेत. मध्यप्रदेशातील खांडवामध्ये असलेल्या शवागरात हा काळजाला चटका लावणारा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. वेळ नसल्याचे कारण दे मुलगा अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई करीत आहे. तर परिवारातील इतर सदस्यांकडे अंत्यदर्शनाला येण्यासाठीही वेळ नाहीये. ही महिला महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीची रहिवासी असून, तिचे नाव पुष्पा असे आहे.

अपघातानंतर पुतण्या मृतदेह हॉस्पिटलमध्येच ठेवून गेला

जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला पुष्पा या पुतण्या अभिषेक, पुतणी पिंकी आणि मुलगी निकिता यांच्यासोबत कारमध्ये बसून बैतूलवरुन ओंकारेश्वरकडे निघाल्या होत्या. गाडी त्यांचा पुतण्या अभिषेक चालवत होता. देसली गावाजवळ कारचे स्टेअरिंग बिघडले आणि गाडी पलटली. या अपघातात पुष्पा, निकिता आणि पिंकी या गंभीर जखमी झाल्या. मात्र ड्रायव्हिंग करणाऱ्या अभिषेकला काही झाले नाही. स्थानिकांच्या मदतीने अभइकने या तिघींना खंडवाच्या रुग्णालयात दाखल केले. जिथे पुष्पाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. निकिता आणि पिंकी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर अभिषेक पुष्पा यांचा मृतदेह खंडवातच सोडून निघून गेला. पुष्पा यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेमही करण्यात आलेले नाही.

मृत पुष्पा यांचा मुलगा ट्रॅव्हल कंपनीत एजंट

आता पोलीस गेल्या तीन दिवसांपासून मृत पुष्पा यांचा सासरच्यांना आणि मुलगा सन्नी, भाऊ राकेश सिंह यांना फोन करीत आहेत. पुष्पा यांच्या पतीचे आधीच निधन झालेले आहे. त्यांना मुलगा सन्नी, मुलही निकिता आणि गुडीया अशी तीन मुले आहेत. या तिघांचीही लग्ने झालेली आहेत. पुष्पा या पतीच्या निधनांनंतर मुलींकडे राहत होत्या. मुलगा सन्नी हा वणीत राहतो आणि ट्रॅव्हलकंपनीत एजंटचे काम करतो. मोघटच्या पोलिसांनी जेव्हा आईच्या मृत्यूची बातमी सन्नीला दिली आणि अंत्यसंस्कारासाठी खंडवा इथे येण्यास सांगितले, तेव्हा सन्नीने आपण येऊ शकत नाही, असे निर्लज्जपणे पोलिसांनाच सांगितले आहे. तिच्याशी संबंध नाही आणि आपल्याकडे इतका वेळही नसल्याचे त्याने फोनवर पोलि्सांना सांगितले.

अखेरीस सख्खा भाऊ येण्यास झाला तयार

यानंतर पोलिसांनी पुष्पा यांच्या सासरे इंद्रजीत यांना संपर्क केला. त्यावेळी त्यांनी आपले वय खूप झाले असल्याचे सांगत, येण्यास नकार दिला. त्यानंतर पुष्पा यांचा भाऊ राकेश येण्यास तयार झाले आहेत. मात्र रिझर्वेशन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. राकेश यांनी अंत्यसंस्कार करणार असल्याचे मान्य केले असले तरी अजूनही पुष्पा यांच्या मृतदेहाला दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे. नात्यांची परीक्षा पाहणारा आणि नात्यांचं वास्तव दाखवणारा हा प्रसंग आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.