AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रिय अभिनेत्रीच्या दुसऱ्या नवऱ्याचं घाणेरडं कृत्य… मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले त्यानंतर…

Actress Personal Life Controversy: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या आयुष्यात अनेकदा उतार चढाव आहे... एका अभिनेत्रीच्या मुलीसोबत सावत्र बापाने घाणेरडं कृत्य केलं होतं... अभिनेत्रीच्या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवला त्यानंतर...

लोकप्रिय अभिनेत्रीच्या दुसऱ्या नवऱ्याचं घाणेरडं कृत्य... मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले त्यानंतर...
अभिनेत्री श्वेता तिवारी
| Updated on: Feb 12, 2026 | 12:53 PM
Share

Actress Personal Life Controversy: झगमगत्या विश्वातील अभिनेत्रींचं आयुष्य दिसायला कितीही ग्लॅमरस असलं तरी, पडद्यामागची कहाणी काही वेगळीच असते. असंच आयुष्य टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जगतेय. पहिलं लग्न अपयशी ठरणल्यानंतर अभिनेत्रीने दुसरा संसार थाटला, पण अभिनेत्रीचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अभिनेत्रीच्या दुसऱ्या नवऱ्याने आणि तिच्या लेकीच्या सावत्र बापाने असं काही घाणेरडं कृत्य केलं.. ज्यामुळे अभिनेत्रीला पोलिसांची मदत घ्यावी लागली. सावत्र बापाने लेकीला अश्लील व्हिडीओ पाठवले आणि तिला मानसिक त्रास देखील दिला.

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री श्वेता तिवारी आहे. पहिल्या लग्नापासून श्वेता हिला एक मुलगी आहे, तर दुसऱ्या लग्नापासून अभिनेत्रीला एक मुलगा आहे. श्वेता हिचं पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर श्वेता आणि राजा यांना लेक पलक हिचं जगात स्वागत केलं. पण मुलीच्या जन्मानंतर दोघांमधील वाद टोकाला पोहोचले…. 2007 मध्ये श्वेता हिने राजा चौधरी यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले…. अखेर 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

पहिल्या घटस्फोटानंतर श्वेता हिच्या आयुष्यात अभिनव कोहली याची एन्ट्री झाली. लग्नाआधी दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील केलं. पहिल्या घटस्फोटानंतर श्वेता हिने दुसरं लग्न 2013 मध्ये अभिनव याच्यासोबत केलं. सुरुवातीला श्वेता आणि अभिनव यांच्यामध्ये सर्वकाही ठिक होतं…

पण श्वेता आणि अभिनव यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. 2019 मध्ये श्वेता हिने दुसरा पती अभिनव याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलं. अभिनव याने मुलगी पलक हिच्यासोबत वाईट कृत्य केलं… मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनव कोहलीने मुलगी पलक तिवारीवर अश्लील कमेंट केल्या आणि पलकला आक्षेपार्ह व्हिडिओही दाखवले. . शिवाय, मुलीचा मानसिक छळ देखील केल्याचे आरोपही करण्यात आले. या संपूर्ण वादाच्या संदर्भात अभिनवलाही अटक करण्यात आली.

एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटींसोबत श्वेता तिवारी हिच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला… पण अभिनेत्रीने त्या सर्व फेटाळल्या… आता श्वेता तिच्या आयुष्यात फार पुढे गेली आहे. श्वेता आता लेक पलक आणि मुलगा रेयांश याच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...