समुद्रावर सहल नेणारी अकॅडमीच अनधिकृत? 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू होताच ग्रामस्थ संतापले; आळंदीत तणाव!

आळंदीतील विनियर्स अकॅडमीमधील २४ मुलांपैकी आठ मुलांचा रायगडातील दिवे आगारात समुद्रात बुडाल्याने मृत्यू झाल्याने आळंदीत तणावाचे वातावरण आहे. या अकादमीच्या बाहेर पालकांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला.

समुद्रावर सहल नेणारी अकॅडमीच अनधिकृत? 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू होताच ग्रामस्थ संतापले; आळंदीत तणाव!
8 students drown at Diveagar, Raigad
| Edited By: | Updated on: Oct 01, 2026 | 11:43 PM

पुण्याच्या आळंदीतील विनियर्स अकॅडमीची सहलीसाठी आलेली आठ मुले रायगडच्या दिवे आगारात समुद्रात बुडाल्याने त्यांचा दुर्देवी अंत झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेस नक्की कोण जबाबदार असा प्रश्न आता विचारला जात आहे. या मुलांच्या पालकांनी गुरुवारी सायंकाळी आळंदीतील विनियर्स अकॅडमी समोर जमत घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. ज्या विनियर्स अकॅडमीने मुलांना सहलीसाठी नेले ती अकॅडमीच आता अनधिकृत असल्याचा आरोप होत आहे.

आळंदीतील ज्या विनियर्स अकॅडमी मधली 24 मुले रायगडच्या दिवेआगार समुद्रात सहलीला गेली होती, त्या स्टडी सर्कल इमारतीच्या बाहेर आळंदीतील शेकडो ग्रामस्थ एकत्र आल्याने सायंकाळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे  इथे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांची  सहल नेत असताना आयोजकांनी मोठा हलगर्जीपणा केल्याचा आरोप आळंदीकरांकडून केला जात आहे.  ही अकॅडमी अनधिकृत असल्याचा आरोप देखील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

Loading...

आळंदी, पुणे येथील विनर्स अकॅडमीचे 11 वी आणि  12 वीची 25 मुले, 17 मुली आणि 06 शिक्षक असे एकूण 48 विद्यार्थी आणि शिक्षक दिघी सागरी , दिवेआगर येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेले होते. त्यातील 08 विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर पोहत असताना बुडाले असून त्यांचे मृतदेह पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठवले आहे. आणि
पुढील कार्यवाही चालू आहे.

मृत झालेल्या दुर्दैवी  मुलांची नावे खालीलप्रमाणे

1) तन्मय दत्तात्रय वहीले

2) सुमित भरत अहिरे

3) प्रणव रामदास बनसोडे

4) कैवल्य सतीश वासनकर

5) राजवीर युवराज वहीले

6) यश किरण वानखेडे

7) सोहम तुकाराम भांडवलकर

8) कौस्तुभ संदीप दौंड

सर्व जण वय 16 वर्षे, राहणार आळंदी, पुणे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us