…अन् काँग्रेस आमदार अमित झनक यांनी धरला ठेका, लग्नसमारंभातला Video viral

...अन् काँग्रेस आमदार अमित झनक यांनी धरला ठेका, लग्नसमारंभातला Video viral
लग्नसमारंभात अमित झनक यांनी धरला ठेका
Image Credit source: Tv9

काँग्रेसचे रिसोडचे आमदार (Congress MLA) अमित झनक (Amit Zanak) यांचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) चांगला गाजतोय. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील वैभव चोपडे यांच्या लग्नात त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी डान्स केला.

प्रदीप गरड

|

Mar 28, 2022 | 1:21 PM

वाशिम : काँग्रेसचे रिसोडचे आमदार (Congress MLA) अमित झनक (Amit Zanak) यांचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) चांगला गाजतोय. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील वैभव चोपडे यांच्या लग्नात त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी व मित्र मंडळींनी आमदार झनक यांना नाचण्याचा आग्रह केला. आमदार अमित झनक यांनाही मग नाचण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय‘ या गाण्यावर ठेका धरला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला वर आणि त्यासोबत त्याची मित्रमंडळी दिसत आहेत. अमित झनक यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. यावेळी त्यांनी लग्नसमारंभास हजेरी लावली. त्यानंतर सर्वांनी त्यांना डान्स करण्याचा आग्रह केला. त्यावेळी त्यांनाही मोह आवरला नाही आणि सर्वांसोबत ठेका धरला. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस आमदार अमित झनक यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा :

Video : आता तर हद्द झाली! Kacha Badamनंतर आणखी एक गाणं सोशल मीडियावर Viral

गर्दी, तरीही शिस्त; जपान मेट्रोचा ‘हा’ Video viral; यूझर्स म्हणतायत, म्हणूनच आहेत जगात सर्वात पुढे…

Video : आधी धूर, मग स्फोट..; Ola S1 Pro स्कूटरला भररस्त्यात लागली आग, तर चांगल्या दर्जाचं साहित्य वापरल्याचा कंपनीचा दावा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें