इर्शाळवाडी आधी कशी होती? दरड कुठे आणि कशी कोसळली? बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून…

या ग्राफिक्स मध्ये बघा ही दरड कशा पद्धतीनं कोसळली आहे. यात तुम्ही हे जुनं गाव देखील बघू शकता. हा एक जुना व्हिडीओ आहे ज्यात इर्शाळवाडी आधी कसं होतं हे दिसतंय. इथे अतिशय सुंदर कौलारू घरं दिसतील.

इर्शाळवाडी आधी कशी होती? दरड कुठे आणि कशी कोसळली? बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून...
irshalwadi raigad landslide
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 20, 2023 | 11:55 AM

खालापूर | 20 जुलै 2023 : राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. काल (19 जुलै 2023) रात्री 11 च्या सुमारास खालापूरमधल्या इर्शाळवाडी मध्ये एक दुर्घटना घडली. या वाडीवर रात्री दरड कोसळली. 15 ते 20 घरांवर ही दरड कोसळल्याची सध्याची माहिती आहे. माहिती मिळताच प्रशासनाने हालचाली सुरु केल्या. बचावकार्यासाठी इथे NDRF ची पथकं, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहचले. आजूबाजूच्या गावातील लोकांनी सुद्धा घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास म्हणेजच अत्तापर्यंत मृतांचा आकडा 7 आहे. मदतकार्य, बचावकार्य जोरात सुरु आहे. इथे या वाडीत जाण्यासाठी फक्त पायवाट आहे. मदतीसाठी लोक या पायवाटेनेच जात आहेत. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणारी ही आदिवासी वस्ती इथे पर्यटकांचं येणं जाणं आहे. या इर्शाळगडावर ट्रेकिंग करण्यासाठी ट्रेकर्सला इथून जावं लागतं. पर्यटकांना इथे गाडी लावावी लागते. इथे गाडी लावून ते वर गडावर जातात. ही वस्ती पायथ्याशी आहे. नेमकी ही दुर्घटना कशी घडली? हे गाव आधी कसं होतं? बघुयात ग्राफिक्स आणि काही जुन्या व्हिडीओच्या माध्यमातून…

दरड कशी कोसळली?

ग्राफिक्स मध्ये तुम्ही जर पाहिलं तर वर तुम्हाला इर्शाळगड दिसेल आणि पायथ्याशी इर्शाळवाडी. या वाडीच्या आणि गडाच्या मध्ये जो डोंगराचा भाग आहे. नेमका हाच डोंगरकडा, यातला मोठा भाग या वस्तीवर कोसळला आहे.

साधारण 15 ते 20 घरांवर ही दरड कोसळल्याचं सांगितलं जात आहे. या ग्राफिक्स मध्ये बघा ही दरड कशा पद्धतीनं कोसळली आहे. यात तुम्ही हे जुनं गाव देखील बघू शकता. हा एक जुना व्हिडीओ आहे ज्यात इर्शाळवाडी आधी कसं होतं हे दिसतंय. इथे अतिशय सुंदर कौलारू घरं दिसतील. हे सुंदर गाव, ही वस्ती आज नाहीशी झालीये. घटनेची माहिती मिळताच NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून बचाव कार्याला सुरूवात झाली आहे.