World Water Day : पूर्व विदर्भातील भूजल पातळी पुन्हा घटली!

नागपूर : पूर्व विदर्भातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. गेल्या पावसाळ्यात अपुरा पडलेला पाऊस आणि भूगर्भातील पाण्याच्या वारेमाप उपशामुळे भुजलपातळीत शून्य ते दोन मिटरपर्यंत घट झाली आहे. 50 तालुक्यात भूजल पातळी घटली आहे. नागपूर भूजल सर्वेक्षण विभागाच्या पूर्व विदर्भात 622 निरीक्षण विहिरी आहेत. यात केलेल्या पाहणीत भूजल पातळी घटल्याचं वास्तव पुढे आलं आहे. पूर्व …

east vidarbha water, World Water Day : पूर्व विदर्भातील भूजल पातळी पुन्हा घटली!

नागपूर : पूर्व विदर्भातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. गेल्या पावसाळ्यात अपुरा पडलेला पाऊस आणि भूगर्भातील पाण्याच्या वारेमाप उपशामुळे भुजलपातळीत शून्य ते दोन मिटरपर्यंत घट झाली आहे. 50 तालुक्यात भूजल पातळी घटली आहे.

नागपूर भूजल सर्वेक्षण विभागाच्या पूर्व विदर्भात 622 निरीक्षण विहिरी आहेत. यात केलेल्या पाहणीत भूजल पातळी घटल्याचं वास्तव पुढे आलं आहे.

पूर्व विदर्भातील भुजलपातळी पुन्हा घट

– 63 तालुक्यांपैकी 50 तालुक्यात भूजल पातळी घटली

– 47 तालुक्यात 0 ते 1 मीटरपर्यंत भूजल पातळीत घट

– तीन तालुक्यात 1 ते 3 मीटरपर्यंत भूजलपातळीत घट

– 13 तालुक्यात भुजलपातळीत वाढ

नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव आणि सडक अर्जुनी, तर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातली स्थिती चिंताजनक आहे. या तालुक्यांमध्ये भूजलपातळीत तब्बल तीन मीटरपर्यंत घट झाली आहे. तर नागपूर विभागातील 13 तालुक्यात भूजलपातळीत वाढ झाल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *