Weather Forecast : विदर्भात आजही पावसाची शक्यता,आयएमडीकडून यलो ॲलर्ट जारी

नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे.

Weather Forecast : विदर्भात आजही पावसाची शक्यता,आयएमडीकडून यलो ॲलर्ट जारी
Weather Forecast
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 9:15 AM

पुणे : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं वर्तवेलल्या अंदाजानुसार राज्यात मंगळवारी औरंगाबाद, अहमदनगर, वाशिम, अकोला, बुलडाणा,नागपूर, चंद्रपूर, नांदेडमध्ये पावसानं हजेरी लावली. विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीठ देखील झाली. शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आज देखील पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

आज पूर्व विदर्भाला यलो ॲलर्ट

नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे.

राज्यात काल झालेल्या पावसाचा आढावा

बुलडाण्यात वीज पडून एकवीस शेळ्या मृत, खामगाव तालुक्यातील घटना

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील बटवाडी खुर्द शिवारात वीज पडून एकवीस शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडलीय. त्यामुळे शेळीपालन कर्त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेय. खामगाव येथील शेळीपालक अशोक पारखे गजानन हटकर आणि साहेबराव हटकर हे नेहमीप्रणे हिवरखेड सह शिराळा शिवारात शेळ्या चारत होते. मात्र, दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला आणि अवकाळी पाऊस सुदधा झालाय.. यावेळी शेळ्यावर वीज पडली असता 21 शेळ्याचा मृत्यू झालाय.. प्रशासनाने पंचनामा करून शेळीपालन कर्त्याला मदत द्यावी अशी मागणी होतेय.

अकोल्यात अवकाळी पावसानं नागरिकांची तारांबळ

अकोल्यात अचानक आलेल्या जोरदार वारा आणि पाउस व गारपीटमुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. या पावसामुळे शहरातील डाबकी रोडवरील नालीचे पाणी रोडवर आल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते.तर या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांची तारांमबळ उडाली होती.

चंद्रपूरमध्ये रात्रीच्या वेळी पाऊस

राज्यातील वातावरण बदलाने चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसधारा कोसळल्या आहेत. सकाळपासून ढगाळ असलेले वातावरण रात्रीच्या सुमारास बदलले. अचानक सोसाट्याच्या वा-यासह पाऊस बरसला. चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच थंडी परतली होती मात्र लगेच वातावरण बदलून आलेल्या पावसाने गारठ्यात वाढ झाली आहे.

इतर बातम्या:

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार, भाई जगताप यांचा पुनरुच्चार

खरेदी केंद्रावरच तुरीचा बाजार अवलंबून, नववर्षात लागणार खरेदीला मुहूर्त

Weather Forecast imd predicted unseasonal rain today in Marathwada and Vidarbha yellow alert

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.