AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार, भाई जगताप यांचा पुनरुच्चार

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी सातत्यानं स्वबळाची भूमिका घेतली. काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्तानं मुंबई काँग्रेसच्यावतीनं आझाद मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार, भाई जगताप यांचा पुनरुच्चार
भाई जगताप
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 8:35 AM
Share

मुंबई : राज्यात शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचा प्रयोग करत सरकार स्थापन केलं आहे. मात्र, निवडणुका कशा लढायच्या यासंदर्भात तीन पक्षांची वेगळी भूमिका दिसून आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी सातत्यानं स्वबळाची भूमिका घेतली. काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्तानं मुंबई काँग्रेसच्यावतीनं आझाद मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई काँग्रेसच्यावतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे काँग्रेस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, अस्लम शेख, नसीम खान माणिकराव ठाकरे, चरणसिंग सप्रा व इतर कॉंग्रेसी नेते पदाधिकारी उपस्थित होते.

भाई जगताप नेमकं काय म्हणाले?

“मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आणि आजही हेच सांगतो 236 जागांवर काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवेल”, असं भाई जगताप म्हणाले. काँग्रेसचं गतवैभव परत आणण्याचा आम्ही मुंबईत प्रयत्न करु, असंही भाई जगताप म्हणाले.

राज्यपालांवर टीका

आज काँग्रेस 137 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो, असं भाई जगताप म्हणाले. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांमध्ये देशात अशा प्रकारची पद्धत कधीही पाहिली नाही की राज्यपालांकडून अनेक गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला जातो. महाराष्ट्राचे राज्यपाल ज्या पद्धतीने आज वागत आहेत हे योग्य नाही. हात दाखवून ओपन मतदान आपण घेऊ शकतो तर मागच्यावेळेस सुद्धा अशीच पद्धत अवलंबली होती मग या वेळेस काय झालं आता अडथळे येत आहेत ?, असे सवाल भाई जगताप यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला. लोकशाहीच्या चौकटीला कोणीही हात लावू नये, येणाऱ्या काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष असेल अशी खात्री असल्याचं भाई जगताप म्हणाले.

त्या घटनेवर भाष्य टाळलं

विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानं निवृत्त होणारे सदस्य यांचा सभापती, उपसभापती यांच्या सोबत फोटो काढण्यात आला होता. यावेळी भाई जगताप आणि रामदास कदम अनुपस्थित होते. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यासंदर्भात विचारलं असता भाई जगताप यांनी मी मी काल पूर्ण दिवस अनुपस्थित होतो, असं सांगितलं. अनुपस्थित असल्यानं मी हजर नव्हतो, मी बाहेर गेलो होतो. त्यावर मी काही बोलू इच्छीत नाही, असं भाई जगताप म्हणाले .

इतर बातम्या:

तुझं थोडंच आयुष्य उरलंय, जगायचं असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव, पुण्यातील विवाहितेकडे मागणी, भोंदूबाबाला अटक

Election: मराठवाड्यात 45 नगरपरिषदांवर प्रशासकाची नियुक्ती होणार, तीन महिन्यात कोणत्या पंचायतींची मुदत संपणार?

Mumbai Congress President Bhai Jagtap said party contest BMC Election without alliance with any party

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.