Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अनेक राज्यांना बसणार अवकाळीचा तडाखा , महाराष्ट्रालाही मोठा इशारा

सध्या देशभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, मात्र पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांमध्ये अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अनेक राज्यांना बसणार अवकाळीचा तडाखा , महाराष्ट्रालाही मोठा इशारा
पुन्हा पावसाचा इशारा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 10:11 PM

देशभरात सध्या उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये सरासरी तापमान हे 40 अंश सेल्सियसच्या वर पोहोचलं आहे. वाढत असलेलं तापमान उष्णतेच्या लाटेचा संकेत देत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल जाणवत असून, विचित्र वातावरण अनुभवयाला मिळत आहे. त्यामुळे उत्तर भारतामधील काही राज्यांमध्ये उन्हाचा कडाका थोडा कमी झाला असून, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील काही दिवस आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण स्कायमेटकडून पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, नव्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे. पुढील तीन ते चार दिवस अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कुठे कुठे पावसाचा इशारा?

स्कायमेटच्या इशाऱ्यानुसार 17 एप्रिलपासून पुन्हा एकदा नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होत आहे. याचा मोठा परिणाम देशातील अनेक राज्यांवर होणार आहे. पुढील 24 तासांमध्ये अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, नागलँड, केरळ, अंदमान, निकोबार बेटं याठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

तर दुसरीकडे महाराष्ट्रात सध्या पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही, मात्र महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णतेची लाट पहायला मिळण्याची शक्यता आहे. विषेत: मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच कडका जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबत गुजरात, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

मान्सूनच आगमन कधी होणार?

यंदा देखील गेल्या वर्षीप्रमाणेच देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता. यंदा जूनमध्ये मान्सूनची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी मान्सूनवर अल निनोचं संकट घोगावत आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us