AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही मुख्यमंत्री झालात तर काय कराल? नाना पाटेकर यांनी फक्त तीनच शब्दात सांगितलं, थेट गडकरींसमोरच…, काय आहे तो किस्सा?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. दरम्यान नाना पाटेकर यांच्या निधनामुळे चित्रपट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या काही जुन्या आठवणी समोर येत आहेत.

तुम्ही मुख्यमंत्री झालात तर काय कराल? नाना पाटेकर यांनी फक्त तीनच शब्दात सांगितलं, थेट गडकरींसमोरच..., काय आहे तो किस्सा?
Nana PatekarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 3:03 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 75  व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीमध्ये कायमस्वरूपी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  चित्रपट सृष्टीचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे. नाना पाटेकर यांनी अशा काही भूमिका केल्या की त्या कधीही विसरता येणं शक्य नाहीये, त्या कायम लक्षात राहणाऱ्या आहेत. दरम्यान नाना पाटेकर हे सामाजिक क्षेत्रात देखील चांगलेच सक्रिय होते. त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठं कार्य केलं, शेतकऱ्यांना आधार दिला.  नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आता नाना पाटेकर यांच्या काही आठवणी किस्से समोर येत आहेत.

नाना पाटेकर यांचा एक असाच किस्सा एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी सांगितला होता. नाना पाटेकर यांना एका निर्मात्याने चित्रपटाची ऑफर दिली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी त्या निर्मात्याला आपल्या घरी बोलावलं, त्याला मटण खाऊ घातलं, आणि त्यानंतर त्यालाच भांडीपण घासायला लावली असा एक किस्सा परेश रावल यांनी सांगितला होतां. परंतु या कार्यक्रमात त्यांनी त्या निर्मात्याचं नाव घेणं टाळलं, असेच नाना पाटेकर यांचे अनेक किस्से आहेत.

नाना पाटेकर यांची राजकारणाबाबत स्पष्ट भूमिका होती. त्यांना जर एखादी गोष्ट खटकली तर समोरचा व्यक्ती कोणीही असो कितीही मोठ्या पदावर असो, नाना पाटेकर लगेच बोलून मोकळे व्हायचे. राजकीय वर्तुळात अनेक नेते त्यांचे चांगले मित्र होते. असाच एक किस्सा आहे. एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.  जर तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न त्यावेळी नाना पाटेकर यांना विचारण्यात आला होता. क्षणाचाही विलंब न लावता नाना पाटेकर यांनी लगेच उत्तर दिलं, ते मला जमणारच नाही, मी काहीही करणार नाही, तो माझा पिंडच नाही, असं नाना पाटेकर म्हणाले होते. यावेळी नितीन गडकरी देखील तिथेच उपस्थित होते. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नाना पाटेकर यांना हा प्रश्न विचारला होता.

Follow Us
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये