AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वीकृत नगरसेवकासाठी शिंदेंचा पहिला शिलेदार ठरला; कोण आहेत राज सुर्वे?

आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांची मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे ते पहिले शिलेदार ठरले असून, यामुळे मागाठाणे येथील कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली आहे.

स्वीकृत नगरसेवकासाठी शिंदेंचा पहिला शिलेदार ठरला; कोण आहेत राज सुर्वे?
Raj Surve
| Updated on: Feb 23, 2026 | 8:10 AM
Share

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या सारीपाटावर राजकीय पुनर्वसनाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत २९ जागांवर विजय मिळवला आहे. यानुसार महायुती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन स्वीकृत नगरसेवक आले आहेत. या स्वीकृत नगरसेवकांच्या पदांपैकी पहिल्या जागेसाठी आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे ते शिंदेंचे पहिले शिलेदार ठरले आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ५ मधून राज सुर्वे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र, ऐनवेळी राजकीय गणिते बदलली. त्यामुळे या ठिकाणी संजय घाडी यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे सुर्वे समर्थक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी तसेच येत्या काळात याचा फटका पक्षाला बसू नये, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे.

कोण आहेत राज सुर्वे?

  • राज सुर्वे हे मागाठाणे मतदारसंघाचे सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र आणि युवासेनेचे सक्रिय नेते आहेत.
  • राज सुर्वे हे युवासेनेचे उत्तर मुंबईतील प्रमुख चेहरा मानले जातात. मागाठाणे आणि दहिसर पट्ट्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच राज सुर्वे यांची तरुणांमध्ये चांगली आणि मजबूत पकड आहे.
  • वडील प्रकाश सुर्वे यांचा दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांचा वारसा राज सुर्वे समर्थपणे पुढे नेत आहेत. स्थानिक स्तरावर आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांत ते नेहमीच अग्रभागी असतात.
  • राज सुर्वे यांची महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी कापली गेली होती. मात्र त्यांनी बंडखोरी न करता त्यांनी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले. त्यांच्या याच निष्ठेचे फळ म्हणून त्यांना आता मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून पाठवण्यात येणार आहे.

शिंदेंनी आखली मोठी रणनीती

दरम्यान राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवक पद मिळाल्याने शिवसेनेची उत्तर मुंबईत ताकद टिकवून ठेवण्यात मदत होणार आहे. त्यासाठी शिंदेंनी ही मोठी रणनीती आखली आहे. राज सुर्वे यांच्या नियुक्तीमुळे मागाठाणे भागातील कार्यकर्त्यांमध्ये बूस्टर डोस मिळाल्याचे वातावरण आहे. दरम्यान दुसऱ्या स्वीकृत जागेसाठी बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

Follow Us
अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह.....
Rain Update : अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह ह्या जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...