AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक महापौर पदाचा उमेदवार कोण, आमदार कांदेंना महाराष्ट्राबाहेरून धमक्या, राऊतांचे दिवाळीआधीच फटाके!

आमदार सुहास कांदेंना महाराष्ट्राबाहेरून धमक्या येत आहेत, नाशिकच्या महापौर पदाचा उमेदवार कोण, असे अनेक फटाके शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत यांनी शनिवारी नाशिकमध्ये फोडले.

नाशिक महापौर पदाचा उमेदवार कोण, आमदार कांदेंना महाराष्ट्राबाहेरून धमक्या, राऊतांचे दिवाळीआधीच फटाके!
संजय राऊत
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 23, 2021 | 4:23 PM
Share

नाशिकः आमदार सुहास कांदेंना महाराष्ट्राबाहेरून धमक्या येत आहेत, नाशिकच्या महापौर पदाचा उमेदवार कोण, असे अनेक फटाके शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत यांनी शनिवारी नाशिकमध्ये फोडले.

शिवसेना नेते संजय राऊत यांची शनिवारची पत्रकार परिषद अपेक्षेप्रमाणे गाजली. त्यांनी थेट नरेंद्र मोदी, अमित शहा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस, किरीट सोमय्या आणि आशिष शेलारापर्यंत साऱ्यांना आपल्या हटके स्टाइलमध्ये उत्तरे दिली. शेवटी ते ज्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आले आहेत, त्याबाबत पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. नाशिक महापौर पदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न त्यांना विचारला गेला. तेव्हा मात्र, पोटातले पाणी हालू न देता त्यांनी तितक्याच कोड्यात टाकणारे उत्तर दिले. ते म्हणाले, महापौर पदाचा उमेदवार. पक्षात असे काही चालत नाही. तुम्हाला वाटलं होतं का मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे आहेत म्हणून, नाही ना. मग आम्ही पाहू. हा पक्षातला विषय आहे. आमच्याकडे असा संघर्ष वगैरे नाही. कोणी बेचैन नाही, अस म्हणत त्यांनी स्टेजवर मागे पाहत इच्छुकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

सत्ताधाऱ्यांना लाजवेल असे काम

शिवसेना विरोधी पक्षात असली, तरी सत्ताधाऱ्यांना लाजवेल असे काम शिवसेनेचे नगरसेवक करत आहेत. भविष्यात निवडणुका आहेत. त्याअगोदर अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करा, अशी विनंती झाली. ते करतो आहे. उद्या सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदार संघात (हे नाव उच्चारताच त्यांना हसू आवरले नाही. कारण भुजबळ-कांदे वाद सर्वश्रुत आहेच. शिवाय कांदेंचे राऊतांनी यापूर्वी केलेले समर्थन.) कार्यक्रम आहे. त्यानंतर मनमाड, दिंडोरी येथे कार्यालयाची उद्घाटने आहेत. शिवसेना पक्षविस्ताराचे काम सुरूच आहे. गटप्रमुख-बुथप्रमुख हा निवडणुकीतील महत्त्वाचा आधार आणि दुवा असतो. पहिल्यापासून शिवसेनेच्या कामाची यंत्रणा ठरलेली आहे, असेही ते म्हणाले.

आमदार कांदेंना महाराष्ट्राबाहेरून धमक्या

शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या धमकीबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, धमक्या देणाऱ्या लोकांचे परदेशात हितसंबंध आहेत. परदेशातून धमक्या येतायत. महाराष्ट्राच्या बाहेरून येत आहेत. सुहास कांदे यांना महाराष्ट्राबाहेरून धमकी आली. मला माहित नाही कोण, काय ते. या धमक्यांचा शोध घ्यावा लागतो. कसंय नरेंद्र मोदींना धमक्या येतात. अमित शहांची सुरक्षा वाढवली आहे. त्यानांही धमक्या येतात. पोलीस शोध घेतील.

भुजबळ सर्वोच्च स्थानी गेले असते

नांदगाव आमदारांच्या संघर्षात अशात काही वाचले नाही ना. देवळालीचे आमदार. हे विषय आम्ही सोडवू. युतीच्या काळातही अशा ठिणग्या पडल्या. आघाडीचे सरकार आहे. एकत्र बसून विषय घेऊ आणि प्रश्न सोडवू असे राऊत म्हणाले. छगन भुजबळ शिवसेनेत राहिलो असतो तर मुख्यमंत्री झालो असतो असे म्हणाले होते. यावर राऊत म्हणाले की, छगन भुजबळ बरोबर बोलतायत. शिवसेनेने अनेक सामान्य लोकांना मंत्री, मुख्यमंत्री बनवले. मात्र, अनेक दुर्दैवी लोक आहेत. ते इतर पक्षात जाऊन त्यांच्या नशिबी काय आले. ठीक आहे कोणी मंत्री झाले, कोणी केंद्रात गेले. मात्र, शिवसेनेच्या वर्तुळात राहून काम करणं महत्त्वाची गोष्ट असते. छगन भुजबळ आज आहेत त्यापेक्षा सर्वोच्च स्थानी गेले असते, असे राऊत म्हणाले.

इतर बातम्याः

अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत, संजय राऊत म्हणाले, तिकडेच थांबायला सांगा!

VIDEO: तुमची बकबक, पकपकच तुमच्या पक्षाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचा सोमय्यांना इशारा

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला