AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत, संजय राऊत म्हणाले, तिकडेच थांबायला सांगा!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू-काश्मिर दौऱ्यावर गेले आहेत. त्याबाबत विचारलं असता राऊत यांनी अमित शाहांनी काही दिवस काश्मिरमध्येच राहावं, अशी टिप्पणी केलीय.

अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत, संजय राऊत म्हणाले, तिकडेच थांबायला सांगा!
अमित शाह, संजय राऊत
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 3:31 PM
Share

नाशिक : सध्या जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदुंना लक्ष्य केलं जात आहे. तर दुसरीकडे बांग्लादेशातही हिंदू वस्त्यांवर हल्ले केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू-काश्मिर दौऱ्यावर गेले आहेत. त्याबाबत विचारलं असता राऊत यांनी अमित शाहांनी काही दिवस काश्मिरमध्येच राहावं, अशी टिप्पणी केलीय. (Sanjay Raut criticizes Union Home Minister Amit Shah’s visit to Jammu-Kashmir)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मिर दौऱ्यावर आहेत, असं एका पत्रकारानं म्हटलं. त्यावर संजय राऊत यांनी लगेच ‘चांगली गोष्ट आहे. त्यांनी तिथेच राहावं काही दिवस. अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, गुलमर्ग या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद सुरु आहे. देशाचे गृहमंत्री तिकडे जाऊन थांबले तिकडे जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना, आर्मीला, पोलिसांना पाठबळ मिळेल’, अशी प्रतिक्रिया दिली.

‘आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष, मुळ पुरुष’

दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या सामनातील अग्रलेखावरुन संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. शेलारांच्या टीकेला राऊतांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. ‘आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष, मुळ पुरुष आहोत आम्हाला कसं काय कुणी शिकवून चालेल. बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, पळून नाही गेलो. तुम्हीच पळून गेलात. काश्मिर खोऱ्यात जे हिंदुंचं हत्याकांड सुरु आहे. बांग्लादेशात जे हिंदुंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत. त्या हिंदुंना संरक्षण देण्याबाबत आजच्या सामनातील अग्रलेखात प्रश्न उपस्थित केलाय’, असं राऊत म्हणाले.

‘..तर मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्यायला हवी’

‘देशाबाहेरील हिंदू असेल किंवा काश्मिरमधील हिंदू असेल, त्यांचं संरक्षण करणं हे केंद्र सरकारचं काम आहे, असं म्हणणं हे काय दारिद्र्य झालं का? असं तर कुणी म्हणत असेल तर मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्यायला हवी. आम्ही म्हणतोय हिंदुंचं रक्षण करा, आम्ही म्हणतोय बांग्लादेशातील हिंदुंना संरक्षण द्या. मोदी सरकारनं बांग्लादेशवर दबाव आणला पाहिजे. भाजपचे खासदार स्वामी असं म्हणतात कि हिंदुस्तानने हिंदुंच्या विषयावर बांगलादेशशी युद्ध केलं पाहिजे, मग यावर मिस्टर शेलार काय म्हणतात? काश्मिर खोऱ्यात मागील 17 दिवसांत हिंदू आणि शिखांच्या एकूण 21 हत्या झाल्या. तर 19 पोलिस आणि जवान मारले गेले आहेत. मग हा प्रश्न विचारणं हे दारिद्र्य झालं का?’ असा सवालही राऊत यांनी विचारलाय.

किरीट सोमय्यांनाही प्रत्युत्तर

संजय राऊत हे नेमके ठाकरेंचे की पवारांचे प्रवक्ते आहेत? असा सवाल विचारला. याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केलीय. ‘मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे काय परग्रहावरुन आलेत का? शरद पवार हे या देशाचे महत्वाचे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहिती नसेल तर सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवारांना आपले गुरु मानतात. त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की, पवार माझे गुरु आहेत. त्यांचं बोट धरुन मी राजकारणात आलोय. म्हणजे एकप्रकारे हे सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत. मोदींच्या गुरुचा अपमान करत आहेत’, अशा शब्दात सोमय्या यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधलाय.

इतर बातम्या :

सोमय्या म्हणाले, राऊत कुणाचे प्रवक्ते, पवारांचे की ठाकरेंचे? आता राऊत म्हणाले, हा तर मोदींचा अपमान

VIDEO: मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल; आशिष शेलार यांचा टोला

Sanjay Raut criticizes Union Home Minister Amit Shah’s visit to Jammu-Kashmir

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.