AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेत्याच्या कंपनीचा भ्रष्टाचार, राऊतांनी नावासह घोटाळा सांगितला

पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटीच्या घोटाळ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्याच्या कंपनीनेच हा भ्रष्टाचार केला आहे. (bjp leader involve in smart city scam, sanjay raut's allegation)

VIDEO: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेत्याच्या कंपनीचा भ्रष्टाचार, राऊतांनी नावासह घोटाळा सांगितला
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 2:55 PM
Share

नाशिक: पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटीच्या घोटाळ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्याच्या कंपनीनेच हा भ्रष्टाचार केला आहे. प्रसाद लाड असं या नेत्याचं नाव आहे, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत आज नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारावरून भाजपला घेरले. मी तुम्हाला स्मार्ट सिटीचा घोटाळा दिला. भाजप नेत्याची ही कंपनी आहे. त्याचे कुटुंबीय ही या कंपनीत आहेत. प्रसाद लाड असं त्यांचं नाव आहे, असं सांगतानाच भ्रष्टाचाराविरोधात लढताय तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही 10 प्रकरणं काढताना 11 वा घोटाळा काढा. तुम्ही 24 हजार घोटाळे काढा. खोटे आहेत ते. बोगस आहात तुम्ही. काल अजितदादांनी जरंडेश्वरप्रकरणात जी कागदपत्रं त्यावर काय उत्तर आहे?, असा सवाल करतानाच ही बकबक काही काळ चालेल, राज्यातील जनता बकबकीला अजिबात उत्तर देत नाही. ही तुमची बकबक आणि पकपक हेच एकदिवस तुमच्या पक्षाच्या राजकारणाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

अजितदादांनी चोख उत्तर दिलं

जरंडेश्वरच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मांडलेले मुद्दे चिंतन करण्यासारखे आहे. पुराव्यासह मुद्दे मांडले आहेत. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रं बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे. त्याला अजितदादांनी पुराव्यासह चोख प्रत्युत्तर दिलं आहे, असं ते म्हणाले.

स्वामींनीच सांगितलं हिंदू खतरे में है

बांगलादेश आणि काश्मीरमध्ये हिंदुंच्या होत असलेल्या हत्यांवरूनही त्यांनी भाजपला घेरलं. बाबरी तोडली तेव्हा आम्ही खाका वर केल्या नाही. आम्ही पळून गेलो नाही. बांगलादेश आणि काश्मीर खोऱ्यातील हिंदुंना संरक्षण देण्यासाठी आम्ही लेख लिहिला आहे. हिंदुच्या रक्षणावर बोलणं म्हणजे दारिद्रय आहे का असं असेल तर दारिद्र्याची व्याख्या सांगा. स्वामींनी सांगितलं बांगलादेशात हिंदू खतरे मे आहे. त्यासाठी युद्ध करा, असं स्वामींनी म्हटलं आहे. त्यावर काय म्हणणार मिस्टर शेलार? असा सवाल त्यांनी केला.

शहांनी काश्मिरातच थांबावं

काश्मीर खोऱ्यात 17 दिवसात 21 शीखांच्या हत्या झाल्या आहेत. 19 जवान शहीद झाले आहेत. हा प्रश्न विचारणं म्हणजे दारिद्र्य आहे का? हा कालपर्यंतचा आकडा आहे, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. त्याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता, चांगली गोष्ट आहे. अमित शहा यांनी काही दिवस त्यांनी तिथेच थांबले पाहिजे. अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर गुलमर्गमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस सुरू आहे. गृहमंत्री थांबले तर अतिरेक्यांवर दबाव येईल. लोकांना सैनिकांना सुरक्षा दलाला पाठबळ मिळेल, असं ते म्हणाले.

सोमय्या मोदींच्या गुरुंचा अपमान करत आहेत

संजय राऊत हे शरदर पवारांचे प्रवक्ते आहेत, या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. मी ठाकरेंचाच प्रवक्ता आहे म्हणून सोमय्यांना स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार पाठवला. मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे परग्रहावरून आलेत का? ते देशाचे मोठे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहrत नसेल म्हणून सांगतो, मोदी पवारांना गुरु मानतात. मोदींनी जाहीरपणे सांगितलं आहे. मोदी म्हणले पवारांचं बोटं धरून मी राजकारणात आलो आहे. एका अर्थाने सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत. सोमय्या मोदींच्या गुरुंचा अपमान करत आहेत, असंच म्हणावे लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला. परमबीर सिंगाला कोणी पळवलं देशातून? केंद्राच्या परवानगीशिवाय एखादा अधिकारी पळून जाऊ शकतो का? सोमय्यांना एवढं जर माहीत नसेल तर हिमालयात जाऊन बसा म्हणावं, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यात जास्त आनंद मिळतोय’, पडळकरांचा घणाघात

आरोग्य विभागाची गट क परीक्षा देताय, ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

VIDEO: मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल; आशिष शेलार यांचा टोला

(bjp leader involve in smart city scam, sanjay raut’s allegation)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.