AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमय्या म्हणाले, राऊत कुणाचे प्रवक्ते, पवारांचे की ठाकरेंचे? आता राऊत म्हणाले, हा तर मोदींचा अपमान

सोमय्या यांनीही संजय राऊत हे नेमके ठाकरेंचे की पवारांचे प्रवक्ते आहेत? असा सवाल विचारला. याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केलीय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

सोमय्या म्हणाले, राऊत कुणाचे प्रवक्ते, पवारांचे की ठाकरेंचे? आता राऊत म्हणाले, हा तर मोदींचा अपमान
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 2:53 PM
Share

नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या धाडीवरुन किरीट सोमय्या हे तपास यंत्रणेचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते विचारत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना सोमय्या यांनीही संजय राऊत हे नेमके ठाकरेंचे की पवारांचे प्रवक्ते आहेत? असा सवाल विचारला. याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केलीय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. (Sanjay Raut responds to BJP leader Kirit Somaiya’s allegations)

मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे काय परग्रहावरुन आलेत का? शरद पवार हे या देशाचे महत्वाचे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहिती नसेल तर सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवारांना आपले गुरु मानतात. त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की, पवार माझे गुरु आहेत. त्यांचं बोट धरुन मी राजकारणात आलोय. म्हणजे एकप्रकारे हे सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत. मोदींच्या गुरुचा अपमान करत आहेत, अशा शब्दात सोमय्या यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधलाय.

संजय राऊतांचा प्रसास लाड यांच्यावर गंभीर आरोप

त्याचबरोबर मी सोमय्यांना पाठवलेलं पत्र हे केवळ पत्र नाही तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील 700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची कागदपत्र आहेत. ज्या कंपनीने हा घोटाळा केलाय ती कंपनी भाजपशी संबंधित एका प्रमुख माणसाची ती कंपनी आहे. माझं असं म्हणणं आहे ती तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढा देताय ना तर तुम्हाला अजून एक प्रकरण दिलं आहे, तुम्ही कशाला घाबरताय. आमचे 10 प्रकरण काढताय ना तुम्ही हे अकरावं काढा. प्रसाद लाड त्या भाजपच्या नेत्याचं नाव आहे. त्यांची ही कंपनी आहे, असा खळबळजनक आरोपही राऊत यांनी केलाय.

‘महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन, त्यात गांजा, भांग पिकवणं शक्य नाही’

त्याचबरोबर महाराष्ट्रात अशाप्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच घडला. पुलोदनंतर हा पहिलाच प्रयोग. हे सरकार पवारांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सध्या महाराष्ट्रात फक्त ईडी, सीबीआय, एनसीबी हेच सुरु आहे. महाराष्ट्र हा एक तुळशी वृंदावन आहे. पण काही लोकांना वाटतं की यात आपण गांजा, भांग पिकवू पण हे शक्य नाही. ईडी, सीबीआयचे घाव किती करणार. मी मागे म्हणालो होतो आता आर्मी आणा. पण हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. त्यामुळे माझ्यावर किती आरोप केले, माझी घेराबंदी केली तरी काही होणार नाही. माझ्या पाठीचा कणा ताठ आहे. माझं मुळ बाळासाहेबांनी फार वेगळ्या प्रकारे बनवलाय. कुणी कितीही फडफड, बडबड करु द्या. काही होणार नाही. त्या कावळ्यांची पिसं झडून जातील, पण हे सरकार पाच वर्षे टिकेल. पण हे सरकार मजबूत आहे, असा दावाही राऊत यांनी केलाय.

इतर बातम्या :

‘संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यात जास्त आनंद मिळतोय’, पडळकरांचा घणाघात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सर्व मेळावे, दौरे तात्पुरते स्थगित! नेमकं कारण काय?

Sanjay Raut responds to BJP leader Kirit Somaiya’s allegations

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.