‘मंत्रालय बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी लुटत होते’, सोमय्यांचा पुन्हा मुश्रीफांवर घणाघात; राजीनाम्याचीही मागणी

सामान्य जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना हसन मुश्रीफ जनतेला लुटत होते. मंत्रालय 100 टक्के बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी रुपये लुटत होते', असा गंभीर आरोप सोमय्या यांनी मुश्रीफांवर केलाय. त्याचबरोबर हा घोटाळा सिद्ध झाला असून, मुश्रीफांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्यांनी केलीय.

'मंत्रालय बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी लुटत होते', सोमय्यांचा पुन्हा मुश्रीफांवर घणाघात; राजीनाम्याचीही मागणी
किरीट सोमय्या, हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 2:45 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केलीय. ‘कोरोना काळात ठाकरे सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरुच होता. सामान्य जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना हसन मुश्रीफ जनतेला लुटत होते. मंत्रालय 100 टक्के बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी रुपये लुटत होते’, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी मुश्रीफांवर केलाय. त्याचबरोबर हा घोटाळा सिद्ध झाला असून, मुश्रीफांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्यांनी केलीय. (Kirit Somaiya makes serious allegations against Hasan Mushrif)

इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिलेलं 1 हजार 500 कोटीचं कंत्राट अखेर रद्द करण्यात आल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. 27 हजार ग्रामपंचायतींचा TDS रिटर्न भरण्यासाठी पुढील 10 वर्षासाठी हे कंत्राट दिलं गेलं होतं. 8 महिन्यांपूर्वी मुश्रीफांचे जावई मतीन यांनी ही कंपनी विकत घेतली. जयोस्तुते कंपनीचा मागच्या 8 वर्षात एक रुपायाचंही आवक-जावक नाही. याचा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आता ठाकरे सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे. याबाबत तक्रार करायला जातानाच मला अडवण्यात आलं होतं. ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय.

सोमय्यांचा अनिल परबांवरही निशाणा

मुश्रीफांसह सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही निशाणा साधलाय. अनिल परब यांना नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत रिसॉर्टची मानली नेमकी कुणाची? परब यांना आता न्यायालयात उत्तर द्यावं लागेल. हा रिसॉर्ट अनधिकृत आहे, असं सोमय्या यांनी म्हटलंय.

सोमय्यांचं संजय राऊतांना आव्हान

संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी लिहिलेल्या पत्रालाही सोमय्या यांनी उत्तर दिलंय. चौकशीचा अधिकार तुम्हालाही आहेच ना. मुख्यमंत्री चौकशी करु शकत नाहीत का? कुठे कुठे घोटाळा झालाय त्याची चौकशी करा, कारवाई करा, तुम्हाला कुणी अडवलं आहे? EOW चा विषय आहे तर मग त्यांना करु द्या चौकशी, असं आव्हानच सोमय्या यांनी राऊतांना दिलंय. तुमच्या गृहमंत्री फरार आहे त्याचं काय? असा खोचक सवालही सोमय्या यांनी यावेळी केलाय.

मुद्दा भरकटवू नका, अजित पवारांना टोला

अजित पवार मिसगाईड करत आहेत. अजित पवार यांनी किती किंमतीला कारखाने विकत घेतले हा मुद्दा नाही. तर बोगस, बेनामी कंपनी स्थापन करुन मंत्रीपदाचा वापर करत बेनामी संपत्ती गुंतवली, याचे पुरावेही दाखवले, त्यांनी त्यावर बोलावं, असं आव्हान सोमय्या यांनी दिलंय. शरद पवार आणि अजित पवार यांनी मी जे मुद्दे उपस्थित केले त्यावर बोलावं, उगाच मुद्दा भरकटवू नये. शरद पवार, अजित पवार हतबल झाले आहेत. म्हणून कुणाची मदत मागत आहेत का? काल ईडी कार्यालयात गेलो होतो. तिथे आंदोलन केलं, त्यापेक्षा उत्तर द्या, असा खोचक टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

‘जास्मिन वानखेडेंवरील बिनबुडाचे आरोप खपवून घेणार नाही’, अमेय खोपकरांचा मलिकांना थेट इशारा

‘हार की प्रहार ? यामधला प्र कधीच निघून गेलाय त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखपत्राच नाव हार ठेवावं’

Kirit Somaiya makes serious allegations against Hasan Mushrif

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.