‘उबाठातील गटबाजी राऊतांपेक्षा जास्त कुणाला माहीत असणार?, मी स्वतः त्यांच्या…,’ काय म्हणाले सरनाईक ?

रॅपिडो आणि ई रिक्षा ज्यांचे परमिट नाहीत, ज्या बेकायदेशीर चालतात. रॅपिडोच्या माध्यमातून बेकायरेशीररित्या प्रवासी वाहन रस्त्यावर आणली जात असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्या गाड्या ताब्यात घेण्याच्या सूचना मी आरटीओला दिल्या असल्याचेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

उबाठातील गटबाजी राऊतांपेक्षा जास्त कुणाला माहीत असणार?, मी स्वतः त्यांच्या..., काय म्हणाले सरनाईक ?
sanjay raut and pratap sarnaik
| Updated on: Nov 03, 2026 | 10:49 PM

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. ठाण्यातील शिवसैनिक प्रदीप पुर्णेकर याच्या राजकीय हत्येवरुन एकनाथ शिंदे यांना उबाठाने घेरल्याचे चित्र आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘दादा आणि शिंदेंचे गट अमित शहा कधीही संपवू शकतात’असे विधान करुन खळबळ उडवून दिली होती. त्यावर आता शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दादा आणि शिंदेंचे गट अमित शहा कधीही संपवू शकतात’ असे विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर प्रताप सरनाईक यांनी जोरदार टोला लगावला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातील गटबाजीवरही निशाणा साधला आहे. प्रताप सरनाईक म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत संजय राऊत यांचाच एक गट आहे. पक्षातील गटबाजी राऊतांपेक्षा जास्त कुणाला माहीत असणार?, मी स्वतः त्यांच्या गटाचा सदस्य होतो असा टोला सरनाईक यांनी लगावला आहे.

Loading...

राज्याच्या राजकारणात गट आणि पक्षांवरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील दोन गट अमित शहा कधीही नष्ट करू शकतात,असा दावा संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या विधानाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत संजय राऊत यांचाच एक गट आहे. पक्षातील गटबाजी राऊतांपेक्षा जास्त कुणाला माहीत असणार?, मी स्वतः त्यांच्या गटाचा सदस्य होतो, असा टोला सरनाईक यांनी लगावला आहे. त्यामुळे राऊतांच्या एका विधानावरून आता सरनाईक विरुद्ध राऊत असा राजकीय सामना रंगला आहे.

खाजगी ट्रॅव्हल्सवर कडक कारवाई करण्याच्या सूचना

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. गेल्या महिन्यातच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाला आहे. प्रवाशांना जे त्रास देण्याचा प्रयत्न करतील ज्यादा दराने भाडे वसूल करतील अशा खाजगी ट्रॅव्हल्सवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले. एसटीचे NCMC कार्ड ही केंद्र सरकारची योजना आहे, राज्य सरकारला त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, काही प्रमाणात अडचणी आल्यात. मात्र, एक कोटी चाळीस लाख प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड घेतले आहे. सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होतोय. मात्र, त्या त्रासावर वेगवेगळे उपाययोजना करून आम्ही मार्ग काढतोय. या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुद्धा सूचना आम्हाला आल्या होत्या.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us