शिवसेना कोणाची? या सहा गोष्टी उद्धव ठाकरेंच्या बाजुने, असीम सरोदे नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. शिवसेनेत दोन गट पडले, त्यानंतर पक्षाचं चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं, त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे, याच प्रकरणावर ही सुनावणी सुरू आहे.

शिवसेना कोणाची? या सहा गोष्टी उद्धव ठाकरेंच्या बाजुने, असीम सरोदे नेमकं काय म्हणाले?
asim sarode
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 7:44 AM

एकनाथ शिंदे यांनी  शिवसेनेतून उठाव केला होता, एकनाथ शिंदे यांनी पक्षातून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. शिवसेनेमध्ये दोन गट पडले. एक शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट. दरम्यान शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेनेचं चिन्ह आणि नाव कोणाला द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला होता. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला, तेव्हा पक्षातील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला, त्यामुळे संख्या बळाच्या आधारे शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. दरम्यान त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला आहे. शिवसेना चिन्ह आणि पक्षाचं नाव हे शिवसेना ठाकरे गटालाच मिळायला पाहिजे, असा युक्तिवाद त्यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, आता शिवसेना शिंदे गटाचे वकील आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडत आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी एक ट्विट केलं आहे. सहा गोष्टी या शिवसेना शिंदे गटाच्या बाजुने असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सरोदे?

‘एकनाथ शिंदेच्या गटाचीच शिवसेना आहे हे सांगण्यासाठी त्यांच्या वकिलांना निवडणूक आयोगाची बाजू कशी बरोबर आहे हे सांगावे लागत आहे. इलेक्शन कमिशनने नियुक्त केलेले वकील वेगळे आहेत तरी शिंदेंच्या वकिलांना इलेक्शन कमिशन च्या कृतीचे समर्थन करून स्वतःची बाजू बरोबर आहे असे सांगावे लागतेय कारण त्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच प्रतिवाद नाही. युक्ती चांगली आहे पण त्याला युक्तिवाद म्हणता येणार नाही अश्या सुमार पद्धतीने तोंडातून वाफ दवडली जातेय आणि कोर्टाचा वेळ वाया घालविला जातोय. घटनाक्रम, वस्तुस्थिती, कायदा, दहावे परिशिष्ट, सिम्बॉल नियम, संविधान अश्या सहा गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. सामना कायदेशीरतेचे सहा खांब विरुद्ध असंवैधानिकतेचे दोन खांब असा आहे.’ असं ट्विट असीम सरोदे यांनी केलं आहे.

 

दरम्यान आज पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, शिंदे गटाच्या वकिलांकडून यावेळी आपल्या पक्षाची बाजू मांडण्यात येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us