शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी, शिंदे गटाच्या युक्तिवादाने प्रकरणात मोठं ट्विस्ट, ठाकरे गटाचं टेन्शन वाढणार?

शिवसेना पक्षाचं चिन्ह कोणाचं? यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावनी सुरू आहे. दरम्यान आज देखील या प्रकरणावर न्यायालयात युक्तिवाद होणार आहे.

शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी, शिंदे गटाच्या युक्तिवादाने प्रकरणात मोठं ट्विस्ट, ठाकरे गटाचं टेन्शन वाढणार?
आज पुन्हा न्यायालयात सुनावणी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 8:17 AM

एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेते मोठी फूट पडली. पक्षात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट असे दोन गट पडले. दरम्यान पक्षात दोन गट पडल्यामुळे पक्षाचं चिन्ह आणि नाव नेमकं कोणाला द्यायचं? असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर होता. अखेर पक्षाचं चिन्ह आणि नाव शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला, दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. याच प्रकरणावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे वकील निरज कौल यांनी शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला होता. दरम्यान आज पुन्हा एकदा या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या आधीच आपला युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे वकील नीरज कौल हे सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडत आहे. दरम्यान मंगळवारी देखील या प्रकरणावर सुनावणी झाली होती.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेना पक्ष एकच होता, फक्त विधीमंडळ पक्षात फूट पडली होती, असा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता, दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या या युक्तिवादाला उत्तर देताना कौल यांनी मंगळवारी न्यायालयात शिवसेना शिंदे गटाची बाजू मंडली. फक्त विधिमंडळ पक्षातच फूट पडली नव्हती, तर पक्षात थेट दोन गट निर्माण झाले होते, असा युक्तिवाद मंगळवारी कौल यांच्याकडून करण्यात आला होता.  दरम्यान त्यानंतर आज पुन्हा एकदा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. आज सुप्रीम कोर्टात काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us