कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात महिला भक्ताला मारहाण, काय झाले नेमके ?
कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात महिला भाविकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मारहाण करणारी महिला श्रीपूजक असल्याचा दावा केला जात आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात महिला भाविकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात महिला भक्ताला मारहाण करणारी व्यक्ती महिला श्रीपूजक असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरण शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले आहे. या प्रकरणात आता चौकशी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे.
या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. याप्रकरणी सायली भोसले यांच्या फिर्यादीवरून प्रिया योगेश जोशी यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पापाची तिकटी परिसरात राहणाऱ्या सायली भोसले या आज पहाटे त्यांची सासू सुवर्ण भोसले मुलगा श्लोक आणि अन्य दोन मैत्रिणींसोबत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या.
यावेळी सायली भोसले आणि त्यांच्या सासू तसेच इतर मैत्रिणी मंदिराच्या आवारातील मुखदर्शन चौकात बसल्या होत्या. यावेळी प्रिया जोशी यांनी सायली भोसले यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या भाविक महिलांना दहा मिनिटात जागा रिकामी करा असा दम दिल्याचा आरोप होत आहे. यानंतर प्रिया जोशी यांनी सायली भोसले यांच्यासह यांच्या सुवर्ण भोसले यांना धक्काबुक्की केल्याचे म्हटले जात आहे. या धक्काबुक्कीची घटना मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी यांच्या फिर्यादीवरून प्रिया योगेश जोशी यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
