महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पाैळ प्रकरणात वडिलांचा झोप उडवणारा खुलासा, थेट मोठी मागणी..

महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पाैळ प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्यातच आता त्यांच्या वडिलांनी गंभीर आरोप केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मोठी मागणी केली.

महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पाैळ प्रकरणात वडिलांचा झोप उडवणारा खुलासा, थेट मोठी मागणी..
wrestler Ashwini Paul
| Updated on: Sep 06, 2026 | 10:39 PM

धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली. कुस्तीच्या खेळाडू असलेल्या अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांना घेऊन किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि एका मुलीवरती धाराशिव येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. पण तिचीही झुंज संपली. अश्विनी पौळ आपल्या तीन लेकरांसह किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. मात्र, त्यांच्या मनात वेगळेच सुरू होते. लेकरांसाठी केक घेऊन त्या किल्ल्यावर पोहोचल्या. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या आयुष्यात मोठा कलह सुरू होता. मुंबईतील नोकरी सोडून त्या आपल्या आई वडिलांकडे येऊन राहत होत्या.

सासरच्या लोकांकडून त्यांना काही दिवसांपासून त्रास दिला जात होता. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूने असे धक्कादायक पाऊल उचलले, ज्याने खळबळ उडाली. अश्विनी यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. वडिलांनी सांगितले की, सासरच्या लोकांकडून तिला नक्की कसा त्रास दिला जात होता.

आता अश्विनी यांच्या वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक साद घालत, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अश्विनीने प्रचंड मेहनतीच्या जोरावर अनेक पदके जिंकली होती. मात्र, कौटुंबिक त्रास आणि मानसिक तणावामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा त्यांचा आरोप आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून अश्विनी त्यांच्या माहेरी राहत होत्या आणि या काळातही त्यांना फोनवरून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी वडिलांनी केलाय. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) ची तपासणी करण्यात यावी, तसेच हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तानाजी मोहिते यांनी केली आहे. तानाजी मोहिते आपल्या लेकीला न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक खुलासे केले जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us