एसटीत प्रसुती, बाळाला टाकून निर्दयी आई पळाली!

गर्भवती महिला प्रवाशाने एसटीत नवजात बाळाला जन्म दिला आणि बाळाला तिथेच सोडून या निर्दयी महिलेने पळ ठोकला.

woman deliver a baby, एसटीत प्रसुती, बाळाला टाकून निर्दयी आई पळाली!

यवतमाळ : पांढरकवडा आगारातील एसटी बसमध्ये मातृत्वाच्या नात्याल्या काळिमा फासणारी घटना घडली आहे. गर्भवती महिला प्रवाशाने एसटी बसमध्येच नवजात बाळाला जन्म दिला. त्यानंतर या निर्दयी आईने बाळाला तिथेच सोडून पळ ठोकला. ही बस पांढरकवडा बसस्थानकातून यवतमाळकडे निघाली होती. जेव्हा चालक-वाहकाला या घटनेची माहिती झाली तोपर्यंत या बाळाचा मृत्यू झालेला होता.

पांढरकवडा बसस्थानकातून 40 ते 45  प्रवाशांनी भरलेली बस यवतमाळच्या दिशेने निघाली. चालक बस चालवत होता, तर वाहक प्रवाशांची तिकीट काढत होता. प्रत्येक थांब्यावर प्रवाशांची चढ-उतार सुरु होती. सायंकाळची वेळ असल्याने बस मधील लाईटचा चालकाला त्रास होत होता. त्यामुळे बसमधील लाईट बंद करण्यात आले.

बसमधील अंधारात त्या गर्भवती महिला प्रवाशाची प्रसुती झाली आणि तिने चालत्या बसमध्येच बाळाला जन्म दिला. मात्र, बसमधील प्रवासी तसेच वाहकाला या प्रसुतीबाबत काहीही कळाले नाही. त्यानंतर या निर्दयी मातेने आपल्या नवजात बाळाला बसमध्येच सोडून पळ काढला. तिच्याकडे कुणाचेच लक्ष नाही याची खात्री करुन ती बसमधून उतरुन गेली.

ही बस यवतमाळ बसस्थानकावर पोहोचली. त्यानंतर सर्व प्रवासी बसमधून उतरले. ड्यूटी संपल्यामुळे बस मधील‌ वाहक आणि चालकही बसमधून उतरत होते, तेव्हा त्यांच्या पायापर्यंत रक्ताची थारोळी आलेली त्यांना दिसली. त्यांनी तात्काळ बसमध्ये शोधाशोध केली. तेव्हा त्यांना मागच्या सीट खाली एक नवजात बाळ आढळून आलं. त्यांनी बाळाला बाहेर काढले, तोपर्यंत त्या बाळाचा मृत्यू झाला होता. आता या बाळाचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला की त्यानंतर हे अद्याप अस्पष्ट आहे.

यवतमाळ आगारात कार्यरत बसस्थानक प्रमुख गोविंद उजवने यांच्यासह बस चालक-वाहक यांनी वडगाव पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी बसस्थानकाकडे धाव घेतली. पोलिसांनी नवजात बाळाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द केला आहे. सध्या या बाळाला जन्म देणाऱ्या त्या निर्दयी आईचा शोध पोलीस घेत आहेत.

संबंधीत बातम्या :

महिलेकडून स्वत:च्या हातानेच स्वत:ची प्रसूती, नागपूर शासकीय रुग्णालयातील प्रकार

झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पगारी पालकत्व रजा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *