AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विलीनीकरण आता होणारच नाही, पण… अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांचं मोठं विधान काय?

Yugendra Pawar : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांची आज बारामतीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

विलीनीकरण आता होणारच नाही, पण... अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांचं मोठं विधान काय?
yugendra PawarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 25, 2026 | 3:39 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, मात्र आता दोन्ही पक्ष्यांच्या नेत्यांनी आता विलीनीकरण होणार नाही अशी माहिती दिली आहे. अशातच आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांची आज बारामतीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. युगेंद्र पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

विलीनीकरण आता होणार नाही

युगेंद्र पवार यांनी विलीनीकरणावर बोलताना म्हटले की, सगळेच जण याबाबत संभ्रमात होते. मात्र विलीनीकरण आता होणार नाही. आपली भूमिका आपण क्लियर केली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील क्लियर केलं की विलीनीकरण होणार नाही. त्यांचा निरोप संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी मी बोलत आहे. चर्चा होती, हे ठीक आहे; पण राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही.’

अजितदादांनी 100 टक्के…

विलीनीकरणाचा फटका युगेंद्र पवारांना बसला का यावर बोलताना त्यांनी म्हटले की, आपण अजित दादांसोबत जाणार होतो, विलीनीकरण जर झालं असतं तर पवार साहेबांनी आणि अजित दादांनी शंभर टक्के माझी काळजी घेतली असती हा विश्वास मला आहे. पुढे 2029 साली पवार विरुद्ध पवार असा सामना होणार का यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, पवार विरुद्ध पवारच लढाई होईल याची काय खात्री आहे, पण उद्या काहीही होऊ शकते. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे, 2029 साठी आणखीन तीन वर्ष आहेत. एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात, तुम्ही 2028 ला मला विचारा मग मी सांगतो.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पद मिळेल अशी इच्छा होती का यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, इथे ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांना मोठी मोठी पदे मिळाली आहेत. कदाचित माझी चुकीचे अपेक्षा असू शकते. तसं काही झालं नाही आणि ते माझ्या फायद्याचं ठरलं. मला लोकांसाठी जास्त वेळ द्यायला मिळाला, लोकांमध्ये मी जावू शकलो. काही लोक पद घेतात पण पदाला न्याय देत नाहीत, मला तसं करायचं नव्हतं. मला पद मिळालं नाही त्यामुळे बारामतीकरांसाठी वेळ देता आला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ