AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yusuf Pathan : क्रिकेटपटू युसूफ पठाणचे सासरे, मेहुण्याला मुंबईत अटक, मोठा राडा, नेमकं काय झालं?

Yusuf Pathan News : भारताचा माजी क्रिकेटर युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान यांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. भायखळा परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

Yusuf Pathan : क्रिकेटपटू युसूफ पठाणचे सासरे, मेहुण्याला मुंबईत अटक, मोठा राडा, नेमकं काय झालं?
युसूफ पठाणच्या सासऱ्यांना अटक
| Updated on: Apr 21, 2026 | 11:58 AM
Share

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आणि पश्चिम बंगालमधील बहारामपूरचे खासदार युसूफ पठाण यांचे सासरे तसेच मेहुण्याला मुंबईत पोलिसांनी अटक केली आहे. भायखळा परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी युसूफ पठाणच्या सासऱ्यांना, तसेच त्याचा मेहुणा आणि आणखी एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे.  शनिवारी रात्री सुमारे 9 च्या सुमारास, पाणी सांडल्यामुळे सुरू झालेल्या किरकोळ वादाचं हाणामारीत रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली असून, पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.

खरंतर, स्थानिक रहिवासी युसूफ खान हे गाडी चालवत घरी जात असताना, त्यांची गाडी एका खड्ड्यात आदळली आणि त्यातील पाणी शोएब खान याच्यावर उडालं. युसूफ खानने आपली गाडी थांबवून माफी मागितली होती, मात्र तरीही शोएबने त्याला शिवीगाळ केली आणि बांबूच्या काठीने गाडीची काच फोडून त्याला जखमी केलं. आणि तिथूनच हे भांडण पेटलं आणि खऱ्या अर्थानं वादाला सुरुवात झाली आणि अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

कधी, कसं , काय घडलं ?

शनिवारी, 18 एप्रिलच्या रात्री 9 च्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं. 30 वर्षांचे युसूफ खान घरी परत येत होते, त्यांची कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून गेली. आणि ते पाणी रस्त्यावरून जाणाऱ्या शोएब खान (35) च्या अंगावर उडालं. मिळालेल्या माहितीनुसार,  शोएब खान हा युसूफ पठाणचा नातेवाईक आहे.

ज्याची गाडी होती, त्या युसूफ खानने असा दावा केला की, त्याने तात्काळ गाडी थांबवून शोएबची माफी मागितली, पण परिस्थिती चिघळली आणि त्यांच्यात वाद झाला. शोएब खानने त्याला शिवीगाळ केली, बांबूच्या काठीने त्याच्या गाडीची काच फोडली आणि त्याला मारहाण केली, असाही आरोप करण्यात आला. त्यानंतर युसूफ खान घरी गेला आणि कुटुंबीयांच्या सल्ल्यानुसार त्याने पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.

मात्र, तो पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच खालिद खान उर्फ ​​मकालिक यांच्याशी त्याची गाठ पडली, जे क्रिकेटर युसूफ पठाणचे सासरे आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खालिद यांनी त्यांची मुलं, उमरशाद खान ( वय 35), शोएब खान आणि दुसरा आरोपी शाहबाज पठाण, यांच्यासोबत पुन्हा भांडण करून युसूफ खान आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई

त्यानंतर याप्रकरणाचा तचपास करताना पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं. यानंतर, भायखळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान यांना अटक केली. मात्र, आरोपी शाहबाज पठाण अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध मारहाण आणि गंभीर शारीरिक इजा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना 2 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वृत्त आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?