दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजप नगरसेवकाचा विरोध

दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजपने विरोध दर्शवला (BJP oppose god name wine shop) आहे. महापालिकेकडून दुकान आणि विविध आस्थापना यांना परवाना देण्यात येतो.

दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजप नगरसेवकाचा विरोध
Follow us
| Updated on: Feb 07, 2020 | 3:16 PM

मुंबई : दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजपने विरोध दर्शवला (BJP oppose god name wine shop) आहे. महापालिकेकडून दुकान आणि विविध आस्थापना यांना परवाना देण्यात येतो. तसेच महापालिकेच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करुन रेस्ट्रोबार, पब, डान्सबार आणि दारुच्या दुकांनाना देवांची नावे देण्यात येऊ नये, असा नियम तयार करावा. तसेच देवदेवतांची नावे असलेले फलक काढून टाकण्यात यावे, अशी मागणीही भाजपचे जोगेश्वरी पूर्वचे नगरसेवक पंकज यादव (BJP oppose god name wine shop) यांनी केली आहे.

भाजपचे जोगेश्वरी पूर्व येथील नगरसेवक पंकज यादव यांनी दारुच्या दुकानांना देवाची नावं देतात त्यावर महापालिकेत नाराजी व्यक्त केली. तसेच ठरावाच्या सूचनेद्वारे त्यांनी ही मागणी महापालिकेत केली.

मुंबई महापालिकेच्या दुकान आणि आस्थापना विभागाच्या वतीने मुंबईतील दुकानांना तसेच विविध आस्थापना यांना परवाना दिला जातो. पण हा परवाना देताना नामफलक कोणत्या भाषेत असावे, किती आकाराचा असावा, मराठी भाषेचा वापर किती असावा इतर नियमांच्या अधीन राहूनच ही परवानगी दिली जाते. तसेच मराठी नामफलकांचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे.

“सर्व धर्मातील लोकांना आपल्या देवाचा आदर असतो. पण जेव्हा ही नावं दारुच्या दुकानावर असतात त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातात. पण हा मुद्दा यापूर्वी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर आर पाटील यांनी उपस्थित केला होता. पण त्या मुद्द्याची पाहिजे तशी अंमलबजावणी झालेली नाही. हा खूप संवेदनशील विषय आहे. त्यामुळे हे सर्व बार, पब, डान्सबार आणि दारुच्या दुकानावरील देवीदेवतांच्या नावाचे फलक काढून टाकावे”, अशी मागणी मी महापालिकेकडे केली.

भाजप नगरसेवकाच्या मागणीने आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत आज अनेक रेस्ट्रोबार, बार, डान्सबार आणि दारुची दुकाने आहेत ज्याला देवदेवतांची नावे दिली आहेत.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.