AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया भट्ट हिचं नणंदेसोबत कसं आहे नातं, दोघींमध्ये आहेत मतभेद? रिद्धिमा म्हणाली, ‘तिला आवडत नाही…’

Alia Bhatt | नणंद रिद्धिमा सहानी हिच्यासोबत कसं आहे आलिया भट्ट हिचं नातं? रणबीर कपूर याच्या बहिणीने कुटुंबातील मोठं सत्य अखेर सांगितलंच... सध्या सर्वत्र रिद्धिमा आणि आलिया यांच्या नात्याची चर्चा... कुटुंबाबद्दल काय म्हणाली रिद्धिमा?

आलिया भट्ट हिचं नणंदेसोबत कसं आहे नातं, दोघींमध्ये आहेत मतभेद? रिद्धिमा म्हणाली, 'तिला आवडत नाही...'
| Updated on: Apr 26, 2024 | 12:50 PM
Share

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून दोघांची ओळख आहे. दोघांना कायम एकमेकांच्या कुटुंबासोबत देखील स्पॉट केलं जातं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर याची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने वहिणी आलिया भट्ट हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कपूर कुटुंबाची चर्चा रंगली आहे. चाहते देखील कपूर कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

रिद्धिमा हिने दिलेल्या माहितीनुसार, आलिया हिच्यासोहत तिचं नातं फार चांगलं आहे. रिद्धिमा म्हणाली, ‘आलिया हिचा सहवास मला प्रचंड आवडतो. तिचा स्वभाव देखील प्रचंड शांत आहे. ती कधीच घरात कोणतं राजकारण करत नाही. आलिया हिला गॉसिप करायला देखील आवडत नाही…’

‘आमच्या दोघींमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या सारख्या आहेत.’ सांगायचं झालं तर, रिद्धिमा हिच्यासोबत मुलाखतीत पती भरत साहनी देखील उपस्थित होते. भरत साहनी यांनी देखील आलिया हिचं कौतुक केलं.. शिवाय जेव्हा अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं, तेव्हा आलिया हिने कपूर कुटुंबाची साथ सोडली नाही.

रणबीर कधीच स्वतःच्या मनातील भावना समोरच्याला सांगत नाही. अशा परिस्थितीत आलिया हिने रणबीर याला सांभाळून घेतलं. सांगायचं झालं तर, नुकताच पार पडलेल्या ‘हिरामंडी’ सीरिजच्या स्क्रिनिंग दरम्यान आलिया हिने आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर यांच्यासोबत एन्ट्री केली. तेव्हा सर्वांची नजर तिघींवर येऊन थांबली.

रिद्धिमा कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, रिद्धिमा अभिनेत्री नसली तरी, कपूर कुटुंबाची लेक असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाहीतर, रिद्धिमा देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स सीजन 3’ मध्ये रिद्धीमा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे.

रिद्धीमा एक प्रसिद्ध ज्वलरी डिझायनर आहे. रिद्धीमा हिचं लग्न उद्योगपती भरत सहानी यांच्यासोबत झालं आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. रिद्धीमा अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. रिद्धीमा देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. रिद्धीमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रिद्धीमा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...