वरळीत BMW चा भीषण अपघात, 6 महिन्यांची चिमुरडी आणि आजीसह तिघांचा मृत्यू

वरळीतील खान अब्दुल गफ्फार खान मार्गवर शुक्रवारी (13 मार्च) दुपारी चारच्या सुमारास बीएमडब्ल्यू (BMW accident in Warli) कारचा भीषण अपघात झाला.

वरळीत BMW चा भीषण अपघात, 6 महिन्यांची चिमुरडी आणि आजीसह तिघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील खान अब्दुल गफ्फार खान मार्गवर शुक्रवारी (13 मार्च) दुपारी चारच्या सुमारास बीएमडब्ल्यू (BMW accident in Warli) कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीत बसलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका 6 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. बीएमडब्ल्यू गाडी स्पीड ब्रेकरला धडकून हा अपघात झाला.

बीएमडब्ल्यू गाडी भरधाव वेगाने येत असताना गाडी चालवत असलेल्या महिलेचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे गाडी रस्तादुभाजकाला (डिव्हायडरला) धडकून अपघात झाला. यानंतर जखमींना तात्काळ जवळच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील गाडी चालवणारी महिला सोडून इतर तिघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. चालक महिला मूळ पुण्याची असून वरळीला आईच्या घरी आली होती. बाहेर जात असताना तिच्यासोबत गाडीमध्ये तिची 6 महिन्यांची मुलगी, आई आणि एक नातेवाईक असे चार जण होते.

चालक महिला नमिता चांद (39) अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भावना बांथिया (61), जूही गुरनानी (52) आणि 6 महिन्याची निषिका यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

BMW Accident in Warli

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *