राणे साहेब, व्यवस्था झाली, अजित दादांच्या मोबाईलवरुन अज्ञाताचा फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरून (Ajit Pawar Phone Hack) राष्ट्रीवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे पैशांची मागणी करणारा अज्ञाताचा फोन आल्याची तक्रार दाखल झाली आहे.

राणे साहेब, व्यवस्था झाली, अजित दादांच्या मोबाईलवरुन अज्ञाताचा फोन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरून (Ajit Pawar Phone Hack) राष्ट्रीवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे पैशांची मागणी करणारा अज्ञाताचा फोन आल्याची तक्रार दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे उपाध्यक्ष नरेंद्र राणे (Ajit Pawar call Narendra Rane) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या नावे पैशांची मागणी करणारा फोन (Call demanding Money) आल्यानंतर राणे यांनी अजित पवारांच्या स्वीय सहायकाशी बोलून याची खातरजमा केली. त्यावेळी अजित पवारांनी असा कोणताही फोन केलेला नसल्याचं उघड झालं.

नरेंद्र राणे म्हणाले, “मला मंगळवारी (1 ऑक्टोबर) सकाळी साडेअकरा वाजता अजित पवार यांच्या फोनवरुन संपर्क साधण्यात आला. अजित पवारांकडून कुणाल बोलतो आहे असं सागून समोरच्या व्यक्तीने मुंबईत पेमेंट करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचं सांगितलं. आपण पुण्यात असल्याचं सांगून तुम्ही मुंबईत आहात म्हणून तुम्हाला सांगत आहे असंही म्हटलं. मी 10 मिनिटे वेळ मागितला आणि अजित पवारांच्या स्वीय सहायकांना याची कल्पना दिली. त्यांनी अजित पवारांशी बोलून असा कोणताही कॉल केलेला नसल्याचं सांगितलं.”

विशेष म्हणजे अजित पवारांनी आपण असा कोणताही कॉल केला नसल्याचं सांगितलं असलं तरी नरेंद्र राणे यांनी आपल्या फोनवर अजित पवारांच्या नावानेच कॉल आल्याचं सांगितलं. त्यामुळे अजित पवार यांचा फोन हॅक झाला असावा, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत राणे यांनी स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांना लेखी तक्रार देऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंती केली आहे.

पैशांच्या मागणीचा फोन कोणी केला?

संबंधित व्यक्तीचा पुन्हा एकदा कॉल आला तेव्हा त्याने पैशांची व्यवस्था झाली असल्याचं सांगितलं. त्याला नाव विचारलं असता त्याने फोन कट केला. दोन्ही वेळी कॉल आला तेव्हा आपल्या फोनवर अजित पवार यांचं नाव आल्याचंही राणेंनी तक्रारीत नमूद केलं आहे. तसेच हे सर्व संशयास्पद असून तपास करावा, अशी विनंती मुंबई पोलीस आयुक्तांना केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *