फडणवीस सरकारची 'दीन'दर्शिका, फुले-आंबेडकरांचा विसर

मुंबई : सभा-भाषणांमधून कायम फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावांचा जयघोष करणारे महत्त्वाच्या वेळी कशाप्रकारे या महापुरुषांना विसरतात, हे महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिकेच्या निमित्ताने समोर आले आहे. फडणवीस सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने 2019 या नववर्षाच्या दिनदर्शिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …

फडणवीस सरकारची 'दीन'दर्शिका, फुले-आंबेडकरांचा विसर

मुंबई : सभा-भाषणांमधून कायम फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावांचा जयघोष करणारे महत्त्वाच्या वेळी कशाप्रकारे या महापुरुषांना विसरतात, हे महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिकेच्या निमित्ताने समोर आले आहे. फडणवीस सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने 2019 या नववर्षाच्या दिनदर्शिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाणदिनाचा आणि महात्मा फुले यांच्या 28 नोव्हेंबर असलेल्या पुण्यतिथीचा उल्लेख नाही.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे वितरण मंत्रालयासह सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये करण्यात आले आहे. ज्या महापुरुषांच्या कार्याने पुरोगामी महाराष्ट्राची ओळख सांगितली जाते, त्यांच्या पुण्यतिथीच्या तारखेचाच फडणवीस सरकारला विसर पडल्याचं ही दिनदर्शिका पाहिल्यावर लक्षात येते. तर दुसरीकडे हा पद्धतीचं कॅलेंडर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हापासून काढलं जातंय. पण तेव्हाही या तारखा त्यात नव्हत्या, असं स्पष्टीकरण भाजपने दिलंय.

6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. या दिवशी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येत जनसागर उसळतो. आंबेडकरांचे विचार मानणाऱ्यांमध्ये या दिवसाचं मोठं महत्त्व आहे. तरीही फडणवीस सरकारने मात्र सरकारी कॅलेंडरमध्ये या दिवसाला स्थान दिले नाही. कुठलाही उल्लेख 6 डिसेंबर या तारखेच्या रकान्यात केला नाही. तसेच, सरकारला महात्मा फुलेंचाही विसर पडला आहे. फुलेंच्या पुण्यतिथीचाही उल्लेख २८ नोव्हेंबर या तारखेच्या रकान्यात नाही.

सरकारच्या या दिनदर्शिकेत इतर सर्व जयंत्या आणि पुण्यातिथ्या देण्यात आल्या आहेत. मात्र, डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांचाच विसर सरकारला पडल्याने आता टीका सुरु झाली आहे. पण 2012 पासूनच म्हणजे आघाडी सरकारच्या काळापासूनच या पद्धतीने कॅलेंडर बनवलं जात असल्याचं भाजपने म्हटलंय. यासोबत 2012 सालच्या कॅलेंडरचा फोटोही भाजपने शेअर केलाय. शिवाय हा प्रकार जाणिवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्यासाठी केलाय का? असा सवालही भाजपने केलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *