Video : बुमराहचा सराव पाहून दिल्ली कॅपिटल्सला फुटला घाम, आता आजमावला असा हात

आयपीएल 2024 स्पर्धेतील 43 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे कोण बाजी मारेल हे सांगणं खूपच कठीण आहे. ऋषभ पंत सध्या फॉर्मात आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने खास प्रॅक्टिस सुरु केली आहे.

Video : बुमराहचा सराव पाहून दिल्ली कॅपिटल्सला फुटला घाम, आता आजमावला असा हात
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 4:35 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. अजूनही कोणाचं काय खरं नाही. आज जे संघ टॉप 4 मध्ये आहेत त्यांची कधी घसरण होईल सांगता येत नाही. अशा स्थितीत प्रत्येक सामन्याचं महत्त्व आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना गुण आणि प्लेऑफचं गणित पाहता खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कंबर कसली आहे. या सामन्यासाठी खेळाडूही नेटमध्ये घाम गाळत आहेत. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानेही सराव केला. मात्र हा सराव काही गोलंदाजीचा नव्हता, तर फलंदाजीचा होता. जसप्रीत बुमराहची नेटमधील आक्रमक फलंदाजी पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीत बुमराहने फटकेबाजी केली तर आश्चर्य वाटायला नको.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात बुमराह फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. संघाच्या धावसंख्येत योगदान देण्यासाठी हा खटाटोप असल्याचं सांगण्यात येत आहे. फ्रेंचायसीने व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे की, “आज बॅटिंग तेरा जस्सी भाई करेगा!”

पर्पल कॅपच्या शर्यतीत मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. त्याने 8 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याचा एव्हरेज 15.69 आणि इकोनॉमी रेट 6.37 इतका आहे. या स्पर्धेत बुमराहने 21 धावा देत 5 गडी बाद केल्याचा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात बुमराह कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नोर्त्झे, खलिल अहमद, मुकेश कुमार.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.