Ambernath Nagar Parishad : कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर कुठं EVM मध्ये छेडछाड; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
अंबरनाथ पोलिसांनी या संशयित 208 महिलांना ताब्यात घेतले असून त्यांची पडताळणी सुरू आहे. याचबरोबर, प्रभाग क्रमांक 28 मध्ये पैसेवाटप झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, ज्यामध्ये दोन जणांना रंगेहाथ पकडल्याचा दावा आहे
महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशीही अनेक गंभीर आरोप-प्रत्यारोप समोर आले आहेत. अंबरनाथ नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 28 मध्ये 208 संशयित बोगस मतदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. काँग्रेसनेही शिंदेच्या शिवसेनेने हे मतदार आणल्याचा दावा केला आहे. या संदर्भात अंबरनाथ पोलिसांनी 208 महिलांना ताब्यात घेतले असून त्यांची पडताळणी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांना महात्मा गांधी शाळेतील खोली क्रमांक सहामध्ये मतदान करायचे होते, मात्र तेथे केवळ एक ते पाच खोल्या असल्याचे दिसून आले. ताब्यात घेतलेल्या महिलांचे पत्ते आणि ओळखपत्र यांची तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. पैसेवाटपाचा आरोपही अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 28 मध्ये पैसेवाटप करणाऱ्या दोन जणांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. या दोघांकडे भाजप उमेदवाराच्या नावाच्या पावत्या सापडल्याचेही राष्ट्रवादीने म्हटले आहे. या प्रकरणामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा

