Maharashtra Election Final Results and Nagaradhyaksha Winners 2025 LIVE :नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात पोलिसांची दादागिरी
Maharashtra Nagar Palika and Nagar Panchayat Election Final Results 2025 and Nagaradhyaksha Winner Updates in Marathi: नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाला सुरूवात झाली आहे. या निकालाकडे राज्याचे लक्ष असून प्रत्येक अपडेट आपल्याला येथे बघायला मिळेल. यांसरख्या इतर क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Nagar Palika, Nagar Parishad, Nagar Panchayat Election Results 2025 LIVE: राज्यात 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. 23 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. 20 डिंसेंबरला त्या 23 नगरपालिकांचे मतदान पार पडले. आता आज 2 डिसेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होत आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत. आजच्या निकालाचे वेगवान अपडेट्स तुम्ही tv9 वेबसाईटवर पाहू शकता. झटपट निकाल आपल्याला बघायला मिळतील. प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल आपल्याला समजतील. मतदान प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली असून आज निकाल असल्याने मोठा बंदोबस्त प्रशासनाकडून ठेवण्यात आला. निवडणुकीच्या निकालाला सुरूवात झाली. या निवडणुकीकडे फक्त राज्याच्याच नजरा नाही तर देशाच्या आहेत. काही ठिकाणी युती म्हणून पक्ष लढले तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुका लढण्यात आल्या.
LIVE NEWS & UPDATES
-
कल्याणमध्ये गाडीचा कट लागल्याच्या कारणातून जोरदार राडा
कल्याण–टिटवाळा परिसरात गाडीचा कट लागल्याने दोन गटात वाद
वादाचे रूपांतर जोरदार राड्यात, रस्त्यावरच हाणामारी आणि दगडफेक
राड्यात तीन ते चार जण जखमी
टिटवाळा पोलिसांनी दोन्ही गटातील ८ जणांविरोधात केला गुन्हा दाखल
राड्याचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
-
चंद्रपूरमध्ये मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये झालेल्या मोठ्या विजयानंतर आता काँग्रेसकडून मनपासाठी इच्छुकांच्या मुलाखतीचं आयोजन
पक्षनिरीक्षकांसह खा. धानोरकर आणि आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती
जिंकणे हा उमेदवारीचा निकष आहेच मात्र पक्षकार्य आणि सामाजिक बांधिलकी देखील महत्वाची – वडेट्टीवार
नगरपरिषद निवडणुकीच्या विजयामुळे काँग्रेसमध्ये उत्साह
-
-
मध्यप्रदेशच्या खंडवा येथील काँग्रेस नेते व माजी मंत्र्याच्या मुलाला अटक
मध्यप्रदेशच्या खंडवा येथील काँग्रेस नेते व माजी मंत्र्याच्या मुलाला महाराष्ट्र पोलिसांनी मध्यप्रदेशच्या खंडवा येथून घेतले ताब्यात
शिरपूर येथील जंगलात वर्षभरापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणात होता फरार
शिरपूर तालुका पोलिसांच्या हद्दीत एक वर्षांपूर्वी जंगलात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी दीड लाख दिल्यानंतर पाऊस न पडल्याने झाला होता वाद
वादात गोळीबार देखील झाला
मध्यप्रदेशचे माजी मंत्री हिरालाल सिलावट यांचा मुलगा यशवंत सिलावट यांना अटक
दोन दिवसाची पोलीस कोठडी
-
पुणे : सिंहगड किल्ल्यावर तीन भव्य तोफगाड्यांचे लोकार्पण
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या दणदणीत घोषणांत सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने या तीन तोफगाड्यांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. अनेक वर्षांपासून गडावरील या तोफा उघड्यावर आणि जमिनीला टेकलेल्या होत्या. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सागवानी गाडे बसविण्यात आल्या असून आता त्यांचे लोकार्पण झाले आहे.
-
नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात पोलिसांची दादागिरी
नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागात पोलिसांची दादागिरी पहायला मिळाली. हप्ता न दिल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला मारहाण केली. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्याचा काही अंतरावर ही घटना घडली आहे. नाईक नामक पोलीस हवालदार दादागिरी करत मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
-
बीड – अनोळखी व्यक्तीच्या खून, चार आरोपींना अटक
बीड जिल्ह्यात आढळलेल्या एका अनोळखी प्रेताची ओळख पटवून अवघ्या दोन दिवसांत खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. मुख्य आरोपी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील गोरोबा मधुकर डावरे याच्यासह संतोष लिंबाजी मांदळे, किशोर गोरोबा सोनवणे आणि अमोल विनायक चव्हाण या चार जणांना अटक करण्यात आली आहे.
-
मालेगाव : आरोपी विजय खैरनारच्या वकिलांकडून आरोपीच्या सुटकेसाठी अर्ज
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे चिमुकली अत्याचार व खूण प्रकरणात मोठी बातमी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर आज दुसऱ्यांदा VC द्वारा सुनावणी पार पडली. आरोपी विजय खैरनारच्या वकिलांकडून आरोपीच्या सुटकेसाठी अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर 27 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
-
ठाकरे सेना-मनसे युतीची मंगळवारी घोषणा होण्याची शक्यता
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेना-मनसे यांच्यातील युतीची मंगळवारी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दोन्ही ठाकरे बंधु संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
-
शिरुरमधील मांडवगण फराटा गावात भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला
राज्यात सध्या बिबट्यांची दहशत पाहायला मिळत आहे. पुण्यात बिबट्यांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात रात्रीच्या वेळी असा एक बिबट्या भक्षाच्या शोधात होता. भक्षाच्या शोधात असताना हा बिबट्या एका विहिरीत पडला. आता घटनास्थळी रेस्क्यू टीम, वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले
वन विभागाने विहिरीत पिंजरा सोडला. त्या बिबट्याला पिंजऱ्यात कैद केलं. त्यानंतर बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आलं. या यशस्वी ऑपरेशनमुळे परिसरातील भीती कमी झालीय.
-
मीरा भाईंदरमध्ये भाजपला मोठा झटका
मीरा भाईंदरमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुझफर हुसेन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपाचे प्रदेश कार्यालय सदस्य अजय अर्जुन सिंग राजपूत यांनी ढोल-ताशांच्या गजरात तब्बल 400 कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
-
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला झटका, माजी नगरसेवकाचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघीरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.
-
नितेश राणे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला, कारण काय?
मंत्री नितेश राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेले आहेत. कोकणातील भाजपच्या पराभवानंतर दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट होत आहे. मालवण आणि कणकवलीतील पराभवानंतर ही भेट होत आहे.
-
धुळ्यात काँग्रेसकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरूवात
धुळ्यात काँग्रेसकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखतीला सुरूवात झाली आहे. खासदार शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. 35 ते 40 इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहिती खासदारांनी दिली आहे.
“महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा समावेश आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकणार”, असा विश्वास शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला.
-
अजित पवारांच्या नाराजीवर महाजनांची खोचक प्रतिक्रिया
एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वार आणि इलेक्शन. पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांच्या नगरसेवकांनी भाजपा केला प्रवेश. त्यावरून अजित पवार झाले होते संतप्त. गिरीश महाजनांनी मात्र दादांना दिले खास प्रतिउत्तर..
-
रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला मिळावं- उदय सामंत
रायगड चे पालकमंत्री पद शिवसेनेला मिळाव असा आग्रह पुन्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज महाड येथील नवनिर्वाचित नगरपालिकेत निवडून आलेल्या सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी म्हटलंय.. माझं स्पष्ट मत या बाबतीत शिवसेनेला मिळाव हेच आहे.मात्र याबाबतीतील निर्णय हा राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घ्यावा. शिवाय हा निर्णय लवकरात त्यांनी घ्यावा… येत्या नवीन वर्षात हा प्रश्न सुटेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला.
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशकात हतबलता
युतीच्या चर्चेसाठी गिरीश महाजनांकडे अक्षरशः लोटांगण. मंत्री नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ वेटिंगवर. चर्चेसाठी ५ मिनटं तरी वेळ द्या, खोसकर यांच्याकडून महाजनांना विनवणी. महायुतीची चर्चा न करताच गिरीश महाजन मुंबईकडे रवाना
-
मला वाटतं अपेक्षित निकाल नगरपरिषदचे लागले- गिरीश महाजन
मला वाटतं अपेक्षित निकाल नगरपरिषद, नगर पालिकेचे लागले. त्याच्याही पुढ आम्ही गेलो आहे. कार्यकर्ते, नेते, मुख्यमंत्री यांनी कष्ट घेतले. त्याचे फळ म्हणावे लागेल. 2 नंबरवर एकनाथ शिंदे, 3 नंबरला अजित दादा आहे.
-
तुमसर नगरपरिषदेचे अपक्ष नगराध्यक्ष सागर गभने राष्ट्रवादी काँग्रेसला केले समर्थन
खा. प्रफुल पटेल व आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत सागर गभने यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. अपक्ष म्हणून निवडून आलो, पण विकासासाठी राष्ट्रवादीसोबतच….नगराध्यक्ष सागर गभने….
-
शासकीय हमीभाव प्रमाणे कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करा
सत्ताधारी पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात रस्ता रोको. रस्ता रोको करताना शेतकरी आक्रमक झाली, शेतकऱ्यांना रस्त्यावर कापूस जाळत विरोध केला. शासकीय हमीभाव प्रमाणे कापूस खरेदी केंद्र (सीसीआय)तातडीने सुरू करा आशा मागण्यांसाठी सिल्लोड मध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन सुरू होते.
-
देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला- चंद्रशेखर बावनकुळे
देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला, चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व नेत्यांनी मेहनत घेतली. आम्ही 51 टक्के मतं मिळाली.. दोन तृतीयांश जागा मिळाला येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदेमध्ये आम्ही 2/3 जागा जिंकू असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
-
जालन्यात पैशाच्या वादातून तरुणाची गोळी झाडून हत्या
जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यात पैशाच्या वादातून एका 30 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. सागर धानोरे असं मयत तरुणाचं नाव आहे. दरम्यान या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हत्या करून आत्महत्येचा बनाव केला होता मात्र पोलिसांच्या तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याच उघडकीस आल आहे.
-
शरद पवार गटाच्या स्मिता कोंढरे अजित पवार यांच्या भेटीला
स्मिता कोंढरे या 2017 मधून राष्ट्रवादीतील नगरसेविका होत्या. तर आता शरद पवार गटात कार्यरत होत्या. आता शरद पवार गटाच्या स्मिता कोंढरे अजित पवार यांच्या भेटीला गेल्या आहेत.
-
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक सुरू
नाशिक- मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले उपस्थित आहेत. मनपा निवडणुकीतील उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू आहे.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवत आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामध्ये दिलेल्या निकालात वाल्मीक कराड याचा खंडणी त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचं केलेलं अपहरण आणि हत्या यामध्ये कॉल डेटा रेकॉर्ड, मोबाईल वरील संभाषण, कराड आणि इतर आरोपींमधील सततचा संवाद, जप्त केलेल्या व्हिडिओ क्लिप्स, आवाजाच्या नमुन्यांच्या सत्यतेची पुष्टी, प्रयोग शाळेतील अहवाल या पुराव्यांच्या आधारे सहभाग असल्याचं दिसत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल 14 हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 11 हजार 150 रूपयांच्या विक्रमी उच्चांकीवर पोहोचले आहेत. सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने दोन लाख 11 हजार रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात देखील 1 हजार 800 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटीसह सह 1 लाख 37 हजार 299 रूपयांवर पोहोचले आहे.
-
घरात बसून पक्ष चालत नाही; संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका
“महाराष्ट्रात त्यांच्या फक्त 9 जागा आल्या आहेत. घरात बसून पक्ष चालत नाही. त्यांच्या कुठेच सभा झाल्या नाहीत. यांच्या नेत्यांना पत्रकार परिषद घेतली यावर सर्व काही असल्याचं वाटतं. याच धुंदीत त्यांनी आपला पक्ष रसातळाला नेला आहे,” अशी टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
-
चंद्रपूर: मनपा निवडणुकीनंतर राज्यभर दौरा करणार- मुनगंटीवारांची घोषणा
महापालिका निवडणुका झाल्यावर मी राज्यभर दौरा करणार असून, यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती भाजप नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. “भाजपमध्ये कुणी नाराज राहू शकत नाही. त्यामुळे या दौऱ्यात सर्वांच्या भेटी घेणार आहे,” असं ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याला ताकद देऊ, असं म्हटलं होतं. त्यावरही मुनगंटीवार बोलले.
“मला ताकदीची गरज नाही. ताकद नसतानाही मी कामे करतो. पॉलिटेक्निक कॉलेज असेल, कॅन्सर हॉस्पिटलचं लोकार्पण असेल, अशी अनेक कामं मी केली आहेत,” असं ठणकावून सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं.
-
माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपू्र्ण निकाल
माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही, असा दिलासा सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला आहे. सरकारी गृहनिर्माण योजनेशी संबंधित 1995 च्या फसवणूक आणि बनावटगिरी प्रकरणात सुनावणी पार पडली.
-
पार्थ पवारांच्या पत्रावरून विजय कुंभार यांचा खळबळजनक दावा, अनेक वर्षांपासून घोटाळा सुरु असल्याचा आरोप
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पार्थ पवार यांच्या सहीचे एक पत्र समोर आले होते, मात्र त्यांनी ती सही आपली नसल्याचा दावा केला आहे. यावर कुंभार यांनी प्रश्न उपस्थित केला असून २५ मे २०२१ रोजी हा व्यवहार पूर्ण झाल्याचे सांगितले. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून हा घोटाळा सुरू असून एकाच नोटरीकडून सर्व कागदपत्रे तयार करून घेतली जात आहेत, असा दावा कुंभार यांनी केला आहे. ही सर्व कागदपत्रे सरकार दरबारी असतानाही अजित पवारांना या सर्व गोष्टींची माहिती होती आणि राज्यातील मुख्यमंत्री व महसूल मंत्री या प्रकरणाला संरक्षण देत आहेत, असा थेट आरोप कुंभार यांनी केला आहे.
-
ग्रामीण भागात राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार – शंकर मांडेकर
पुणे जिल्हा परिषद आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी पक्षाच्या यशाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. कालच्या निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून, “मागच्या काळात आमचा एकही नगरसेवक नव्हता, आम्ही शून्यापासून सुरुवात करून ४ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष निवडून आणला,” असे मांडेकर यांनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस १०० टक्के ताकदीने उतरणार आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार असल्याचा दावा शंकर मांडेकर यांनी यावेळी केला.
-
चंद्रपुरात सरसंघचालक मोहन भागवत करणार कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन; आचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधी प्रेक्षकांमध्ये
चंद्रपूर येथील पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आज आगमन झाले. सध्या महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने या कार्यक्रमात एक आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले. राज्याचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी व्यासपीठावर न जाता सामान्य जनतेमध्ये बसणे पसंत केले. आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्यासाठी कार्यक्रमाच्या मुख्य मंचकावर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत केवळ जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय नियमांचा आदर राखत पार पडत असलेल्या या सोहळ्याची सध्या जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
-
महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे कॅप्टन देवेंद्र फडणवीस : संजय केनेकर
भाजप नेते संजय केनेकर यांनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या एक अकेला क्या करेगा या विधानाला प्रत्युत्तर देताना केनेकर म्हणाले की, रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभवाच्या धास्तीने त्यांची मनस्थिती बिघडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे कॅप्टन देवेंद्र फडणवीस असून महायुतीचा खेळ भाजपाच्या पिचवर सुरू आहे, त्यामुळे रन रेट चांगलाच मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-
लवासा गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार, अजित पवारांना मोठा दिलासा
लवासा प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शरद पवार आणि अजित पवारांविरुद्ध दाखल झालेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
पुण्यात महायुतीचा पेच, उदय सामंत जागावाटपाचा तोडगा काढणार
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाची चर्चा अद्यापही रेंगाळलेली आहे. शिवसेनेने ३५ जागांची आग्रही मागणी केली आहे, मात्र भाजप एवढ्या जागा सोडण्यास तयार नसल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मूळ शिवसेना चिन्हावर नेमके किती नगरसेवक निवडून आले होते, याची विचारणा भाजपकडून केली जात असल्याने दोन्ही पक्षांतील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ स्तरावर चर्चा करूनही तोडगा निघत नसल्याने अखेर शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत आज पुण्यात येत आहेत. जर भाजपकडून समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत, तर शिवसेना पुण्यात स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नाशिक – माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली होती मात्र शिक्षा कायम ठेवली होती. कोकाटे यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यात आलं असून सर्वोच्च न्यायालय आज शिक्षा कायम ठेवणार की दिलासा देणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
दिल्ली ते मुंबई एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग
दिल्ली ते मुंबई एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. विमानाता हा बिघाड कशामुळे झाला ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
-
चाळीसगाव नगरपरिषद निकालानंतर उमेदवाराच्या घरावर दगडफेक
चाळीसगाव नगरपरिषद निकालानंतर उमेदवाराच्या घरावर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली व त्यानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. संबंधित अज्ञात तरुणांविरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.
-
चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढताय – संजय राऊतांची शिंदेंवर टीका
नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून असली कोण, नकली कोणं असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत. त्यांना सांगा चोरलेलं चिन्हा बाजूला ठेवा आणि मग निवडणूक लढवून दाखवा. चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढताय, अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
-
वसई विरार महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता
वसई विरार महापालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ सोबत काँग्रेस,मनसे, शिवसेना उबाठा युतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम. 70 टक्क्यात बविआ तर 30 टक्क्यात इत्तर तीन पक्षाच्या जागा वाटपावर बोलणी सुरू आहे. पण ठाकूरांकडून 30 टक्के जागा देण्यावर नकार असल्याची अधिकृत सूत्रांची माहिती. इच्छुकांची गर्दी वाढल्याने जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता
-
नाशिकमध्ये शिवसेनेची भाजपकडे 45 जागांची मागणी
नाशिकमध्ये शिवसेनेची भाजपकडे 45 जागांची मागणी. सन्मानपूर्वक जागा द्या, अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी. नगरपरिषद निवडणुकीत आम्ही दाखवून दिलं. शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांचं वक्तव्य. युती करायची तर खुल्या दिलाने करा. मोठा भाऊ फक्त आकड्यावर ठरत नाही, तर वागण्यावर देखील ठरतो. नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर आता महापालिकांमध्ये युतीबाबत आम्ही अहवाल एकनाथ शिंदेंकडे पाठवला.
-
सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीची स्विमिंग स्पर्धेत सुवर्ण भरारी
सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीची स्विमिंग स्पर्धेत सुवर्ण भरारी. राष्ट्रीय स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी सूर्यवंशीची 3 सुवर्णपदकांसह हॅट्रिक. 12 ते 17 डिसेंबर दरम्यान दिल्लीत राष्ट्रीय स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धा पार पडली. देगाव कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या श्रावणी सूर्यवंशीने 19 वर्ष वयोगटात खेळताना विजयाची उत्तुंग भरारी घेतली आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात जनतेचा महायुतीला कौल
धाराशिव जिल्ह्यात नगरपालिकेसाठी जिल्ह्यातील जनतेने महायुतीला कौल दिला. भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी जनतेचे आभार मानून निवडणुकीदरम्यान दिलेला विकासाचा शब्द हा आता कृतीतून साकार करण्याचे आश्वासन दिले आहे.जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर दाखवलेला प्रचंड विश्वास हा अभिमानास्पद आहे.
-
चाकण – शिक्रापूर महामार्गावरील शिक्रापूर येथे ट्रक आणि कारचा अपघात
चाकण – शिक्रापूर महामार्गावरील शिक्रापूर येथे ट्रक आणि कार यांच्यात समोरा समोर जोरदार धडक होऊन भिषण अपघात झालाय. अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर इतर तीघांची प्रकृती गंभीर चिंताजनक आहेत. देवदर्शन करून चाकण ला जात असताना या तरूणांवर काळाने घाला घातलाय,अपघाताची तीव्रता येवढी भिषण होती की कार चा जागीत चक्काचुर झालाय अपघातात सागर थोरात या कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय.
-
माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची आज नाशिक कोर्टात सुनावणी
माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची आज नाशिक कोर्टात सुनावणी होणार आहे. रोहित पवार आजच्या सुनावणीला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माणिकराव कोकाटे विधानसभेत रम्मी खेळत असल्याचा रोहित पवारांनी आरोप केला होता. याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी दावा दाखल केला आहे.
-
राज्यात तापमानाचा पारा घसरला, थंडीची लाट, एक्युआय 180 वर धोकादायक श्रेणीत पोहोचलाय…
राज्यात तापमानाचा पारा घसरला थंडीची लाट सध्या पहायला मिळतेय. तर एक्युआय 180 वर धोकादायक श्रेणीत पोहोचलाय. तापमानात झालेली घसरण ही आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळेल, तर दुपारनंतर आकाश निरभ्र राहील. मंबईचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने दिवसा उकाडा आणि रात्री गारवा असा अनुभव मुंबईकर घेत आहेत.
-
भाजप-शिवसेनेतील शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेला खिंडार; शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. ‘मन की बात’ नको, ‘जन की बात’ हवी; भाजपच्या अनुसूचित सेलच्या सचिवांचा घरचा आहेर… तर घराणेशाही आणि निष्ठावंतांची गळचेपी; ३८ वर्षांची साथ सोडली ! शिंदे गटाच्या विभागप्रमुखांचा काँग्रेसमध्ये ‘हात’. कल्याणमध्ये काँग्रेस होणार ‘किंगमेकर’; आणखी नाराज माजी नगरसेवकही संपर्कात असल्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा दावा.
-
पुणे : आवक आणि मागणी वाढल्याने बहुतांश सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर
आवक आणि मागणी वाढल्याने बहुतांश सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. राज्यसह पर राज्यातून सुमारे 100 ट्रक आवक झाली आहे. थंडीमुळे पपईची मागणी वाढली आहे. गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 100% भाज्यांची आवक झाली आहे.
-
पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो.., निकालानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची एक्स पोस्ट
नगरपालिका–नगरपंचायत आज 21 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागला. सर्व कल हाती आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सोशल मीडियावरुन मतदारांचे आभार मानले जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनीही पोस्ट केलीय. सकपाळ यांनी या एक्स पोस्टमध्ये या निवडणुका विचारधारेच्या ताकदीवर लढा दिल्याचं म्हटलंय.
हर्षवर्धन सपकाळ यांची एक्स पोस्ट
सत्तेचा माज, पैशांची उधळण आणि प्रशासनाचा गैरवापर, या सगळ्या अडथळ्यांवर मात करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांत विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून उभा राहिलेला हा संघर्ष होता.
या… pic.twitter.com/3RMvGA2Uno
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) December 21, 2025
-
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नगरपरिषद-नगरपंचायतीच्या निकालानंतर पंतप्रधानांची पोस्ट
नगरपरिषद-नगरपंचायतीचे निकाल स्पष्ट झाले. राज्यात महायुतीला बहुमत मिळालं. या दणदणीत विजयानंतर पंतप्रधानांची नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच मोदींनी महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटलं. मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
लासलगाव बायपास रोडवर कंटेनर–दुचाकीचा भीषण अपघात
लासलगाव बायपास रोडवर कंटेनर–दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार झाली आहे. तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. गायत्री हेमंत घायाळ असं या मृत महिलेचे नाव आहे. तर गंभीर जखमीवर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा कंटेनर मुंबईहून कांदा भरण्यासाठी आला होता. या प्रकरणात लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
-
देवाभाऊ म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली देणगी – पडळकर
देवाभाऊ म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. भाजपाचे काम लोकांना कळू लागले आहे, त्यामुळे सांगली नव्हे तर महाराष्ट्रभर भाजपाला भरभरून यश मिळत आहे. जत आणि आटपाडीमध्ये यश मिळवल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
-
नशिराबाद येथील नगरपंचायतीत 77 वर्षांच्या आजीबाई विजयी
जळगावच्या नशिराबाद येथील नगरपंचायत निवडणूकीमध्ये चक्क 77 वर्षांच्या आजीबाई विजयी झाल्या आहेत. जनाबाई रंधे असे नगरसेवक पदी विजयी झालेल्या आजीचे नाव असून त्यांनी भाजपातर्फे निवडणूक लढवली होती. नशिराबाद येथे प्रभाग क्र 7 (अ ) मधून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या.
-
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
बैल बाजार परिसरातील दोन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शकील खान आणि मालवी अशी दोन नगरसेवकांची नावे आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह मनसेचे देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला आहे.
-
गेवराईच्या जनतेने खुप छान साथ दिली – गीता पवार
गेवराईच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गीता पवार यांनी म्हटले की, गेवराईच्या जनतेने खुप छान साथ दिली आहे. मंत्री पंकजाताई मुंडे, माझं पवार कुटुंब आणि आमचे मोठे बंधू बदामराव पंडितांनी देखील साथ दिली म्हणून हा विजय मिळाला. मला फक्त विकास आणि विकासच माहिती आहे. समोरच्याने काय आरोप करावेत आणि सतत काय उत्तर देत राहावं याला माझ्याकडे काहीच अर्थ नाही.
-
BMC निवडणुकीत ठाकरे गटाला भोपळा मिळणार – मंत्री आशिष शेलार
मंत्री आशिष शेलार यांनी आजच्या निकालावर बोलताना म्हटले की, आजच्या ऐतिहासिक निकालाच्या अर्थ म्हणजे उबाठा सेना येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत त्यांना भोपळा (शून्य) मिळणार आहेत. उखाड दिया म्हणणारे संजय राऊत यांना माझ्या सवाल आहे, आताच्या आलेला निकालातून तुमच्या तंबू राज्यातील जनतेने उखडून कुठे विसर्जित केला ते मला सांगावं.
-
माझ्या पत्नीचा झालेला पराभव मला मान्य आहे- मंत्री संजय सावकारे
भुसावळमध्ये मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. यावर बोलताना मंत्री सावकारे म्हणाले की, ‘भुसावळकरांना जे मान्य होतं तेच भुसावळकरांनी केलं. राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हातात भुसावळकरांना सत्ता द्यायची होती, ती त्यांनी दिली. माझ्या पत्नीचा झालेला पराभव हा मला मान्य आहे.
-
धाराशिव : माजी मंत्री बसवराज पाटील यांनी मानले मतदारांचे आभार
धाराशिव जिल्ह्यातील मुरूम नगरपालिकेत भाजपाने परंपरेनुसार एक हाती सत्ता मिळवत नगरपालिका ताब्यात घेतले आहे. माजी मंत्री आणि भाजपचे नेते बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील हे अध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. बापूराव पाटील यांना मुरूम येथून 4000 मतांनी निवडून दिल्याने माजी मंत्री बसवराज पाटील यांनी मतदाराचे आभार मानले आहेत. मुरूम नगरपालिकेत नगराध्यक्ष सह 20 पैकी 19 जागेवर भाजपने विजय मिळवला आहे.
-
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटात नाराजी, थेट उपोषणाचा इशारा
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटात नाराजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यापूर्वीच मोठी बातमी
कल्याण पश्चिम परिसरात इच्छुक उमेदवारांचे रस्त्यावर उतरत शक्तीप्रदर्शन
‘निष्ठावंतांना न्याय द्या, नाहीतर उपोषण’चा इशारा
-
नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपाचा शिवसेनेला सहा जागांचा प्रस्ताव
नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपाचा शिवसेनेला सहा जागांचा प्रस्ताव
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत हेमंत पाटील मांडणार मुद्दा
मात्र शिवसेना निम्म्या जागा लढण्यावर ठाम
जर अर्ध्य्या जागा नाही मिळाल्या तर स्वबळावर निवडणूक लढणार, शिवसेनेचा इशारा
-
शिवसेना निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत
शिवसेना निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत
शिवसेनेचे ऑपरेशन टायगर पुन्हा होणार सक्रिय- सुत्र
शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे उद्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरे
शिवसेना आणि ठाकरेंच्या निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची घेणार भेट
विरोधी पक्षातील निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची देखील भेट घेण्याची शक्यता
-
परतुरमध्ये भाजपचा विजय, अजित पवार गटाला धक्का
परतुरमध्ये गेल्या 30 वर्षापासून माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्या नेतृत्वात असलेल्या एक हाती सत्तेला भाजप ने लावला सुरुंग
राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का
माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर परतुमध्ये सत्ता खेचून आणण्यात यशस्वी
भाजपच्या उमेदवार प्रियंका राक्षे नगराध्यक्षपदी
परतूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती प्रचार सभा
-
डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा
डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. डोंबिवलीच्या फडके रोडवर हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि नव्याने पक्षप्रवेश केलेले ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईरसह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत.
-
राहाता, शिर्डी पालिकेत भाजपाच्या विजयानंतर विखे पिता-पुत्रांचा मोठा जल्लोष
राहाता आणि शिर्डी पालिकेत भाजपाच्या विजयानंतर विखे पिता पुत्रांनी मोठा जल्लोष केला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखेंनी फुगडी खेळल्याचे दिसून आले. तर सुजय विखेंनी नंतर भन्नाट डान्सही केला.
-
भाजपा सत्तेत नसती तर….निकालानंतर यशोमती ठाकूर यांची सडकून टीका
भाजपकडे शासन, प्रशासन, पैसा आणि सत्तेची ताकद असूनही त्यांनी दमदाटी व अरेरावी करून निवडणुका लावून घेतल्याचे सर्वांनी पाहिले आहे. जितका आव भाजप आणतो, तितकी त्यांची प्रत्यक्ष ताकद नाही, हे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे, असे मत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. आज अमरावती जिल्ह्यात सहा ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले असले तरी अनेक नगरपरिषदांमध्ये त्यांना अपयश आले आहे. सहा ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, जर ते सत्तेत नसते तर त्यांची संख्या आणखी कमी झाली असती, असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला.
-
कराड नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजेंद्रसिंह यादव 9735 मतांनी विजयी
कराड नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे व शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांचं विजयानंतर औक्षण करण्यात आलं तर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. त्यांचा 9735 मतांनी विजय झाला. -
कराड नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेंद्रसिंह यादव यांचा विजय
कराडमध्ये शिंदे यांची शिवसेनेची यशवंत विकास आघाडी व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी लोकशाही आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे संयुक्त उमेदवार राजेंद्रसिंह यादव हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
-
सातारा नगरपालिकेत अमोल उदयसिंह मोहितेंवर मतांचा पाऊस, कोण जिंकलं?
सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांना 57 हजार 587 एवढी मतं पडली आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुवर्ण पाटील यांना 15 हजार 555 मतदान पडले. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते रेकॉर्ड ब्रेक करत 42 हजार 32 मतांनी विजयी झाले आहेत. यावेळी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची सातारा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
-
कर्नाटकचं पार्सल कर्नाटकला पाठवा! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी
बीडमध्ये कर्नाटकचं पार्सल कर्नाटकला पाठवा.. म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. आमदार विजयसिंह पंडितांकडून देखील अजितदादा आगे बढो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो म्हणत घोषणाबाजी केली. योगेश क्षीरसागर यांनी प्रचारादरम्यान गेवराईचे पार्सल गेवराईला पाठवणार अशी केली होती घोषणा. बीड मधील विजयानंतर क्षीरसागर यांना घोषणाबाजीतून प्रत्युत्तर.
-
येवला नगरपालिकेच्या निकालानंतर शहरात तुफान हाणामारी
येवला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारच्या निकालानंतर शहरातील मोमीनपुरा भागात तुफान हाणामारी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या पराभवातून वाद उफाळला आहे. शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. हाणामारीत तीन पुरुष व एक महिला जखमी झाली आहे.
-
गडचांदूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप बंडखोर निलेश ताजणे विजयी
गडचांदूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप बंडखोर निलेश ताजणे विजयी झाले आहेत. भाजप आमदार देवराव भोंगळे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मतदारसंघातील दोन्ही नगरपरिषदांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे.
-
महाविकास आघाडीला बदलापूर नगर परिषदेत मिळाला भोपळा
बदलापूर नगरपरिषदेचा निकाल समोर आला आहे. भाजपचे 23 नगरसेवक, तर शिवसेना शिंदे गटाचे देखील 23 नगरसेवक असल्याचे समोर आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन नगरसेवक निवडून आल्याचे चित्र आहे. तर महाविकास आघाडीला बदलापूर नगरपरिषदेत भोपाळा मिळाला आहे.
-
मतमोजणी पार पडल्यानंतर शिरपूर येथे झाली दगडफेक
धुळे येथील शिरपूर येथे मतमोजणी पार पडल्यानंतर दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सूत्रांच्या माहितीनुसार चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला आहे.
-
बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या तेजस्विनी कथले यांचा विजय
भाजपाच्या तेजस्विनी कथले यांचा 4639 हजार मतांनी विजय. माजी आमदार राजेंद्र राऊत त्यांच्या नेतृत्वात आली बार्शीत नगरपरिषदेत भाजपाची एकहाती सत्ता. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपालांना बार्शीत मोठा धक्का. बार्शीत 42 नगरसेवकांपैकी भाजप आणि शिंदे गटाला 23 तर शिवसेना ठाकरे गटाला 19 तर जागा मिळाल्या आहेत
-
शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शालिनी संजय खातळे या 5870 मतांनी विजयी
भाजपच्या मधुमालती मेंद्रे यांचा पराभव. निवडून आलेले 21 नगरसेवक खालील प्रमाणे. शिवसेना शिंदे गट 5, राष्ट्रवादी अजित पवार 13, उबाठा 1, भाजपा 2
-
Beed Local Body Election Results 2025: बीडमध्ये मोठी अटीतटीची लढत सुरू
बीडमध्ये भाजप पिछाडीवर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 3894 मतांनी आघाडीवर. बीडमध्ये मोठी अटीतटीची लढत सुरू. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होत आहे लढत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्याही बीडमध्ये झाल्या होत्या प्रचार सभा.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे कमळ फुलले
पुणे ग्रामीण निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांचा दणका. आळंदी नगर परिषदेमध्ये 21 पैकी 15 जागांवर वर्चस्व. नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे यांची बहुमताने निवड
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, म्हणाले निवडणुकीत पैशांची…
निवडणुकीत पैशांची गारपीट झाली असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सत्ताधीर पक्षातच स्पर्धा लागली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
-
गडचिरोली नगरपरिषद भाजप पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार प्रणोती निंबोरकर विजयी
आरमोरी येथील नगरपरिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार रुपेश पुणेकर विजयी. देसाईगंज नगर परिषदेतील नगराध्यक्ष भाजप उमेदवार लता सुंदरकर विजयी. गडचिरोलीतील तीन नगरपरिषदे भाजप पक्षाचे नगराध्यक्ष एकतर्फी विजयी झाले
-
Badlapur Body Election Results 2025 : बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांना मोठा झटका
वामन मात्रेच्या एकाच घरातील सहा उमेदवार पैकी तीन उमेदवार विजयी उमेदवारांचा पराभव. वामन म्हात्रे , भाऊ तुकाराम म्हात्रे , उषा तुकाराम म्हात्रे हे तिन्ही विजयी तर.. वामन म्हात्रे यांचा मुलगा वरून म्हात्रे, भावेश म्हात्रे, आणि वामन म्हात्रे यांची पत्नी नगर अध्यक्षपदाची उमेदवार वीणा मात्र यांचा पराभव
-
Pune Local Body Election Results 2025 : अजित दादांचे पुणे जिल्हावर पुन्हा वर्चस्व सिद्ध
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी 17 पैंकी 10 जागा एनसीपी पार्टीकडे, 1 जागा युतीकडे. अजित पवार यांच वर्चस्व पुणे जिल्हात कायम
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : बहिणीच्या विजयानंतर धनंजय मुंडे थेट गंगाखेडमध्ये..
धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे गंगाखेडमध्ये नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या. आज त्यांचा विजय झाला असून धनंजय मुंडे बहिणीच्या विजयी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी थेट गंगाखेडमध्ये पोहोचले.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील नगरपालिकांचे निकाल हाती आले असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे राज्यात नंबर दोनचा पक्ष शिंदेंची शिवसेना ठरली. यादरम्यान जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानताना एकनाथ शिंदे दिसले.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का…
अतूल चाैगुले शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. श्रीवर्धनमध्ये अतूल चाैगुले यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली. मात्र, ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
-
करमाळयात भाजप व शिवसेना ( शिंदे गटाला ) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराभूत
करमाळा नगरपालिका निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडीची निकालात मुसंडी. करमाळा शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनी संजय सावंत विजयी. करमाळा शहर विकास आघाडीकडून जल्लोषाला सुरुवात. जेसीबीतून गुलाल उधळत करमाळा शहर विकास आघाडीकडून आनंद साजरा
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : एकनाथ शिंदे यांची जादू कायम..
नगरपालिका निवडणुकीचे निकाल पुढे येत असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष राज्यात ठरला आहे. भाजपानंतर दोन नंबरचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट ठरलाय. हे मोठे यश एकनाथ शिंदे यांचे म्हणावे लागेल.
-
Mohol Election Results 2025 : मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी
अवघ्या 22 वर्षाच्या सिद्धी वस्त्रे या मोहोळच्या नगराध्यक्षपदी विजयी. लोक विकासाला मतदान करतात आणि आम्ही कामातून विरोधकांना उत्तर दिले. मोहोळ मध्ये विजयानंतर शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात आलाय.
-
Beed Local Body Election Results 2025: धारूरमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व
भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंना धक्का. भाजपचे उमेदवार पराभूत. नगराध्यक्षासह 20 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीचे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 तर भाजपचे सहा नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : रक्षा खडसे यांना सर्वात मोठा धक्का, शेवटी..
मंत्री रक्षा खडसे गेल्या काही दिवसांपासून प्रचारासाठी मैदानात उतरल्या होत्या. मात्र, अनपेक्षित धक्का त्यांना बसला असून थेट मुक्ताईनगर सेनेच्या संजना चंद्रकांत पाटील विजयी झाल्या. भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला..
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : सासवडमध्ये जेसीबीतून गुलालाची उधण
सासवडमध्ये जेसीबीतून गुलालाची उधण भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळत आहे.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : भाजपाला वर्ध्यात मोठा धक्का बसला आहे
भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून महायुती 216 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला असून वर्ध्यात माजी खासदार तडस यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : रक्षा खडसे आणि पंकजा मुंडेंना धक्का
परळी नगरपालिकेचे निकाल हाती आले असून भाजपा उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसे यांनाही झटका बसला आहे.
-
Parli Election Results 2025: परळीला बदमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- धनंजय मुंडे
परळीला बदनाम करणाऱ्यांना मायबाप जनतेने धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया विजयानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे. अजित पवार गटाने परळीत धमाका केला आहे.
-
Shevgaon Local Body Election Results 2025: शेवगावात माया मुंडे नगराध्यक्षपदावर विजयी
एक एक करून नगरपालिकांचे निकाल हाती येत आहेत. शेवगावात माया मुंडे या नगराध्यक्षपदावर विजयी झाल्या आहेत.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : ठाकरे सेना एका जागेवर विजयी
नगरपालिकांचे निकाल येत असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना शिंदे गट देखील नंबर दोनचा पक्ष आहे. मात्र, ठाकरे गटाला या निवडणुकीमध्ये कमाल करता आली नाही. फक्त एका जागेवर शिवसेना यश मिळाले.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : नगरपालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांची जादू कायम..
नगरपालिका निवडणुकीचे निकाल पुढे येत असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांची एक जादू बघायला मिळत आहे. भाजपा 127 पदांवर आघाडीवर आहे.
-
Beed or Gevrai Local Body Election Results 2025: भाजपाच्या गीता पवार विजयी
बीड जिल्हातील गेवराई येथील निकाल हाती येत असून भाजपाच्या गीता पवार विजयी झाल्या आहेत.
-
Ahilyanagar or Pathardi Local Body Election Results 2025: अहिल्यानगरच्या पाथर्डी भाजपा विजयी.
अहिल्यानगरच्या पाथर्डीत भाजपाचे अभय आव्हाड हे विजयी झाले आहेत. भाजपा या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला असून 128 जागांवर भाजपा आघाडीवर आहे.
-
Washim Local Body Election Results 2025: वाशिममध्ये अवघ्या एका मताने उमेदवाराचा झाला पराभव
वाशिमनगर परिषदेच्या निवडणूक निकालात भाजपचे माजी आमदार लखन मलिक यांचे पुत्र नितेश मलिक यांना नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 2 मधून अवघ्या 1 मताने पराभव. उबाठा शिवसेनेच्या उमेदवार करुणा कल्ले या झाल्यात विजयी..
-
कणकवलीत नितेश राणेंना मोठा धक्का
कणकवलीत नितेश राणे यांना धक्का बसला असून राणे विरूद्ध राणे अशी लढत बघायला मिळाली होती.
-
Parbhani or Gangakhed Local Body Election Results 2025 : धनंजय मुंडे यांच्या बहिणी उर्मिला केंद्रे विजयी
नगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती येत असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांची बहिणी उर्मिला केंद्रे या गंगाखेडमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार होत्या. उर्मिला केंद्रे विजयी झाल्या आहेत. स्वत: धनंजय मुंडे प्रचारासाठी मैदानात उतरले होते.
-
Nanded or Loha Local Body Election Results 2025: लोह्यात शरद पवार विजयी
नांदेडच्या लोह्या तालुक्यात अजित पवार गटाचे नेते शरद पवार हे विजयी झाले आहेत. अजित पवार गटाने लोह्यात चांगली मुसंडी मारल्याचे बघायला मिळतंय.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : वाड्यात भाजपाचे 17 पैकी 11 उमेदवार विजयी
हळूहळू नगरपरिषद निवडणुकीचे निकाल हाती येत असून वाड्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून वाड्यात 17 पैकी 11 उमेदवार भाजपाचे निवडून आले आहेत
-
नंदकिशोर मुंदडा विजयी, अंबाजोगाईमध्ये स्थानिक आघाडी विजयी
भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा विजयी झाले आहेत. पंकजा मुंडे थेट मैदानात उतरल्या होत्या.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : महायुती 200 पार झाली असून महायुतीचा बोलाबाल बघायला मिळतोय
नगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती येत असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपा 123 जागांवर आघाडीवर आहे.
-
Raigad or Mahad Election Results 2025: महाडमध्ये भरत गोगावले यांनी गड राखला
महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 8 नगरसेवक विजयी झाले असून मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेचा गड राखला आहे.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता
नगरपालिका निवडणुकीचे निकाल येत असून श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपाची सत्ता आली असून हा मोठा विजय म्हणावा लागेल.
-
Raigad or Uran Local Body Election Results 2025: उरणमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का
नगरपालिकेचे निकाल पुढे येत असून उरणमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : कळमनुरी शिवसेना शिंदे गटाची जोरदार कामगिरी..
कळमनुरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 20 पैकी 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. कळमनुरीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचा बोलबाल बघायला मिळत आहे.
-
Pune or Saswad Local Body Election Results 2025 : सासवडमध्ये भाजपाचा मोठा जल्लोष
नगरपरिषद निवडणुकीचे निकाल येत असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सासवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.
-
Ratnagiri or Chiplun Local Body Election Results 2025: चिपळूणमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा 1 मतानी विजय
नुकताच चिपळूणचा निकाल हाती आला असून भाजपाच्या उमेदवाराचा एका मताने विजय झाला आहे. या विजयाची चर्चा राज्यभर रंगताना दिसत आहे.
-
Raigad or Alibaug Local Body Election Results 2025 : शेकापचे अक्षय नाईक विजयी
शेकापचे अक्षय नाईक आलिबागमध्ये विजयी झाले आहेत. आलिबागच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्यामध्येच आता निकाल पुढे आला असून विजयाची माळ अक्षय नाईक यांच्या गळ्यात पडलीये.
-
Maharashtra Nagar Panchayat Election Results : येवल्यात अजित पवारांचे उमेदवार आघाडीवर
येवल्यामध्ये अजित पवारांचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. काटोल्यात अनिल देशमुखांना धक्का बसला असून भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
-
Amravati Local Body Election Results 2025 : अमरावतीमध्ये भाजपाची मोठी मुसंडी
नगरपालिकेंच्या निवडणुकींचे निकाल येत असून भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यासोबतच भाजपान अमरावतीमध्येही मोठी मुसंडी मारल्याचे सध्याचे चित्र आहे.
-
Maharashtra Nagar Panchayat Election Results : भाजपा सर्वात मोठा पक्ष
नगरपरिषद आणि नगरपंचायत समितीचे निकाल पुढे येत असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपा तब्बल 103 जागांवर आघाडीवर आहे, हे सुरूवातीला येणारे आकडे आहेत.
-
Sindhudurg or Malvan Local Body Election Results 2025: मालवणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार विजयी
मालवणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार विजयी ठरले आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाचा बोलबाला बघायला मिळतोय.
-
Parbhani or Gangakhed Local Body Election Results 2025: गंगाखेडमध्ये उर्मिला केंद्रे आघाडीवर
गंगाखेडमध्ये उर्मिला केंद्रे आघाडीवर आहेत. उर्मिला केंद्रे या धनंजय मुंडे यांच्या भगिनी असून धनंजय मुंडे स्वत: बहिणीसाठी मैदानात दाखल झाले होते. गंगाखेडमध्ये प्रचार करताना धनंजय मुंडे दिसले होते.
-
Bhagur Election Results 2025 : भगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय
भगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय. सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. हा अजित पवार गटाचा मोठा विजय म्हणावा लागेल.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा झटका
नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल पुढे येत असून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसला असून फक्त 2 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.
-
सांगोल्यात शहाजीबापूंचे उमेदवार आघाडीवर
सांगोल्यातील निवडणूक तूफान चर्चेत होती. आता निवडणुकीचे निकाल पुढे येत असून सांगोल्यात शहाजीबापूंचे उमेदवार आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.
-
Maharashtra Nagar Panchayat Election Results : नगरपरिषद निवडणुकीमध्ये अजित पवारांचा बोलबाल..
भगूरमध्ये अजित पवार गटाचे सर्वच सात उमेदवार आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. ही आघाडी सुरूवातीला येणाऱ्या कलानुसार आहे.
-
Satara Local Body Election Results 2025: साताऱ्यात दोन्ही राजांना धक्का
साताऱ्याचे निकाल येताना दिसत असून नगरपरिषद आणि पंचायतीचे निकाल येत असून साताऱ्यात दोन्ही राजांना धक्का बसत असून अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुढे आहेत.
-
Baramati Local Body Election Results 2025 : बारामतीबद्दल अजित पवारांचा जलवा
बारामतीमध्ये अजित पवार यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर असून अजित पवारांचा जलवा बघायला मिळत आहे.
-
Beed Local Body Election Results 2025 : बीडमध्ये भाजपा आघाडीवर
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल येत असून सुरूवातीचे काैल पुढे येत आहेत. बीडमध्ये भाजपा आघाडीवर आहे.
-
Election Results 2025: शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर
शिवसेना शिंदे गट नगरपालिका निवडणुकीमध्ये सध्याच्या कलांमध्ये दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. महायुती सध्याच्या आकडेवारीनुसार, 177 जागांवर आघाडीवर आहे.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : महायुती 157 जागांवर आघाडीवर, महाविकास आघाडी 32 जागांवर आघाडीवर..
सुरूवातीचे कल हाती लागले असून महायुतीचे वर्चस्व सध्या बघायला मिळत आहे. महाविकास आघाडी 157 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी पिछाडीवर दिसत आहे.
-
Maharashtra Nagar Panchayat Election Results : भाजपा 74 जागांवर आघाडीवर
सुरूवातीचे कल हाती येत असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपा 74 जागांवर आघाडीवर आहे. महायुती 137 जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी 27 जागांवर आघाडीवर दिसत आहे.
-
Maharashtra Nagar Panchayat Election Results : पोस्टल मतमोजणीला सुरूवात
पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सकाळी 10 वाजता मतदान मतमोजणीला सुरूवात झाली असून अगदी काही वेळात निकाल पुढे येतील. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
-
Maharashtra Nagar Panchayat Election Results : मतमोजणीला काही वेळात होणार सुरूवात
मतमोजणीला आता काही वेळात सुरूवात होणार आहे. पुढच्या सात ते आठ मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरूवात होईल. संपूर्ण राज्याच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या आहेत.
-
काही वेळात होणार मतमोजणीला सुरूवात, तळेगाव दाभाडेमध्ये परिस्थिती काय?
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या 28 जागांसाठी मत मोजणीअगदी काही वेळात होणार असून मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडणार आहे, 10 वाजता या मतमोजणी ला सुरुवात होणार असून 14 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी, 2 नोडल अधिकारी, 14 विभागीय अधिकारी, 28 मतमोजणी सहाय्यक असून मदतीसाठी नगरपरिषदेचे 60 कर्मचारी सुद्धा असणार आहे.
-
निकालापूर्वी जळगावच्या चाळीसगाव शहरात विजयाचे बॅनर झळकले
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर जळकले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपकडून निकालापूर्वी विजयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रतिभा चव्हाण यांची लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देणाऱ्या आशयाचे बॅनर झळकले आहे.
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : राज्यातील दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे
नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल येण्यासाठी आता अवघे काही मिनिट राहिले आहेत. राज्यातील बड्या दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. 42 नगरपंचायतींचे आज निकाल आहेत. 246 नगरपरिषदांचेही निकाल आहेत.
-
Maharashtra Nagar Panchayat Election Results : काही वेळात हाती येणार निकाल
अगदी काही वेळात नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येतील. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. राज्याच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत.
-
अक्कलकोटमध्ये मतमोजणी सुरू होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला सुरुवात
फटक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. मतमोजणी सुरु होण्याआधीच अक्कलकोटमध्ये झळकले अभिनंदनाचे बॅनर. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांच्या अभिनंदनाचे बॅनर अक्कलकोट शहरात झळकले. अक्कलकोटमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे
–
-
Parbhani Local Body Election Results 2025: परभणीत सात ठिकाणी आज मतमोजणी होणार
पालकमंत्री मेघना बोर्डीकर सहित रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर यांची प्रतिष्ठा पनाला. सकाळी 10 वाजता सात ही ठिकाणी सुरू होणार मतमोजणी धनंजय मुंडे यांच्या बहीण उर्मिला केंद्रे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनैद दुर्राणी यांच्या भवितव्याचा काही वेळात होणार फैसला. बारा वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित. चार राऊंड मतमोजणी चालणार आहे,
-
नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकेच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळातच सुरुवात होणार
मतमोजणीच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. उमेदवारांच्या भव्तव्य मतपेटीत बंद झाले असल्याने अवघ्या काही वेळात मत पेट्या उघडल्या जाणार. सुरुवातीला टपाली मतदान उघडला जाणार आहे तर त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार..
-
धुळे जिल्ह्यातील शिरपूर पिंपळनेर नगरपरिषदेसह शिंदखेडा पंचायत समितीचा आज मतमोजणी
जिल्ह्यातील 2 नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीसाठी झालं होतं दोन डिसेंबरला 65%मतदान. तीन नगरपरिषदेपैकी दोंडाईचा नगरपरिषद झाले आहे बिनविरोध. भाजपाने या अगोदरच दोंडाईचा नगरपरिषद बिनविरोध केली आहे..उर्वरित दोन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीचा आज मतमोजणी..
\
-
Maharashtra Nagar Panchayat Election Results : वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदेचे निकाल आज जाहीर होणार
वर्धा नगरपरिषदेकरिता जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी होणार. वर्ध्यात सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार. वर्धा देवळी आर्वी पुलगाव सिंदी (रेल्वे) हिंगणघाट येथे कोणाला कौल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष. नगरपरिषद निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पनाला. मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी
-
मतमोजणी साठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद साठी आज मतमोजणी होणार आहे , आणि याची उत्कंठा शिगेला पोहचली असून सकाळी दहा वाजता अकराही नगरपरिषदेसाठी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाने संपूर्ण तयारी केलेली आहे. ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, यामध्ये जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी हे तैनात असणार आहे , त्यामध्ये एसआरपी सीआरपीच्या तुकड्या सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे.
-
सकाळी दहा वाजता मतमोजणीला होणार सुरूवात
15636 एवढं मतदान या ठिकाणी झालेला आहे. 59 उमेदवार हे या ठिकाणी रिंगणात होते त्यांचे भवितव्य आज उघडणार. खडसे वर्सेस आमदार चंद्रकांत पाटील अशी लढत या ठिकाणी चुरशीची झाली. एकनाथ खडसे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे. आमदार चंद्रकांत पाटील यांची या ठिकाणी प्रतिष्ठापनाला आहे
-
Maharashtra Nagar Parishad Election : अंबरनाथ शहरात 59 जागांसाठी आज मतमोजणी पार पडणार
महात्मा गांधी शाळेमध्ये या मतमोजणीसाठी सज्ज आहे. मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार. शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज अंबरनाथ शहरामध्ये कोणाची सत्ता येणार त्याकडे सर्वांचे लक्ष
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात उमेदवारांच्या घेणार मुलाखती
आज सकाळी पासूनच अजित पवार घेत आहेत पुणे महापालिकेत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती. उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार 41 प्रभागातील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वांच्या मुलाखती. सकाळी पासूनच इच्छुकांची मोठी गर्दी. बारामती होस्टेल मध्ये पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुणे महापालिकेच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू
-
Maharashtra Nagar Panchayat Election Results : अमरावती जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीचा निकाल
अमरावती जिल्ह्यातील सर्व दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतची आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी. पोलिस आणि प्रशासनाकडून मतमोजणीची संपूर्ण तयारी. मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ज. नगराध्यक्षपदाच्या 12 जागा आणी 278 नगरसेवकासाठी झाले होते मतदान. नगराध्यक्षाच्या 12 जागेसाठी 71 उमेदवार तर नगरसेवकासाठी तब्बल 1250 उमेदवार रिंगणात. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषद सर्वात मोठी नगरपरिषद. अचलपूर नगरपरिषद मध्ये मतमोजणीच्या तब्बल 14 फेऱ्या होणार. सर्व मतमोजणी केंद्रावर 2 हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी हजर राहणार
-
जळगाव जिल्ह्यातील 18 नगराध्यक्ष पैकी एका जागेवर भाजपाची आधीच आघाडी
जामनेर नगरपरिषदेवर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील 18 नगराध्यक्ष पैकी एका जागेवर भाजपने आधीच आघाडी घेतली आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध झाल्या आहेत. नगराध्यक्ष पदाबरोबरच भाजपचे 9 नगरसेवक पदाचे उमेदवार देखील बिनविरोध झाले आहेत. नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक बिनविरोध झालेली जिल्ह्यातील जामनेर नगरपालिका एकमेव. 17 नगरसेवक पदाच्या जागांसाठी चा निकाल आज बाहेर पडणार आहे….
-
Maharashtra Nagar Parishad Election Results : धाराशिव जिल्ह्यात आज आठ नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार
भूम, परंडा, कळंब, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम आणि उमरगा या नगरपालिकेची होणार मतमोजणी. उमरगा, भूम, परांडा या नगर पालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना अशी तगडी फाईट तर धाराशिव, तुळजापूर येथे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना. जिल्ह्यात 8 नगराध्यक्ष पदासाठी 38 उमेदवार रिंगणात आहेत तर 189 नगरसेवकांच्या जागेसाठी 643 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Published On - Dec 21,2025 7:02 AM
