AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता,पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा खळबळजनक दावा

भाजपमध्येही अशी काही लोकं आहेत, ज्या पद्धतीने भाजप पुढे जातो आहे ते यांना नको आहे. येथे व्यक्ती म्हणून कोणी नाही, भाजपचे केडर आहे. येथे संघटन आहे म्हणून आम्ही जिंकलो आहोत. जयकुमार गोरे किंवा इतर कोणी आहे म्हणून नाही असेही गोरे यावेळी म्हणाले.

राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता,पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा खळबळजनक दावा
Jayakumar Gore
| Updated on: Feb 10, 2026 | 9:21 PM
Share

जे मला गुंड म्हणत आहे, तेच सर्वात मोठे गुंड आहेत.आज माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचे वातावरण आहे.अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे.ज्या पद्धतीने भाजपला मते मिळाली ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी झाली आहे. त्याठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता अशी माहिती समोर येत आहे. पोलीस याचा योग्य तो तपास करीत आहेत असा खळबळजनक दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

हा कट कोणी रचला होता, ते भविष्यात पोलीस तपासात समोर येईलच.याप्रकरणामागे कोणता गुंडा आहे. हे समोर येईलच त्यानंतर आपण चर्चा करू असेही जयकुमार गोरे यावेळी म्हणाले.

चौकशी झालीच पाहिजे

चौकशी झालीच पाहिजे असं आमचं देखील मत आहे.त्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. त्यामुळे त्याबाबतीत अधिकच बोलणं योग्य नाही. चौकशीसाठी कुठली एजन्सी असली पाहिजे. याचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतील.तपास यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील असेही गोरे यांनी यावर प्रतिक्रीया देताना सांगितले.

सातारा येथील पराभव

पराभव झाल्यानंतर कारणे सांगण्याची मला सवय नाही. पराभव का झाला याचं विश्लेषण मी करणार नाही, मात्र झालेला पराभव मी स्वीकारतो. सोलापूरकडे लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे.केवळ दुर्लक्ष होणे हे एकमेव पराभवाचे कारण नाही,असे अनेक पराभवाचे धक्के मी स्वीकारलेले आहेत.या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. राजकारणातून प्रत्येक जण अशा पराभव होऊनच पुढे जातो.मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे पराभव हा अंतिम नसतो आणि विजयी अंतिम नसतो.कामात सातत्य असले पाहिजे.

पालकमंत्री अपयशी झाल्यानंतर काय करायचं, याचाही प्लॅन आखला गेला होता. जर बहुमत नाही मिळालं तर कोणाला सोबत घ्यायचं याचाही प्लॅन केला गेला होता. पक्ष आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्लॅन होता. पक्षापेक्षा आम्ही कसे मोठे आहोत हे दाखवण्याचा काही जणांचा प्रयत्न होता. पण मी भाजपच्या कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानतो. कोणत्याही  अपप्रचाराला बळी न पडता ते आमच्या मागे उभे राहिले असेही गोरे यावेळी म्हणाले

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?