AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

War : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक इशारा अन् युद्ध पेटणार… इस्रायल या देशावर हल्ला करणार?

Israel Iran Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत बेंजामिन नेतान्याहू इराणच्या कथित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत ट्रम्प यांना माहिती देणार आहेत.

War : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक इशारा अन् युद्ध पेटणार... इस्रायल या देशावर हल्ला करणार?
Trump and Israel
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 20, 2025 | 11:19 PM
Share

जगावर आता आणखी एका युद्धाचे सावट आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये 29 डिसेंबर रोजी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत बेंजामिन नेतान्याहू इराणच्या कथित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत ट्रम्प यांना माहिती देणार आहेत. तसेच याचा धोका किती आहे? यावर कारवाई करणे गरजेचे आहे का? याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जर कारवाई करण्यास परवानगी दिली तर इस्रायल आगामी काळात इराणवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इराणवर पुन्हा हल्ला करणार ?

एनबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार इराणने आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्पावर चांगलाच भर दिला आहे. यामुळे इस्रायली अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. इराणचा अणु प्रकल्प बंद पाडण्यासाठी ते ट्रम्प यांना याबाबत माहिती देत आहेत. जर ट्रम्प यांनी याला परवानगी दिली तर आगामी काळात इस्रायलतचे सैन्य इराणवर हल्ला करू शकतात. त्यामुळे आता महत्त्वाचा निर्णय ट्रम्प यांच्या हातात आहे.

जूनमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध

जूनमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये दोन आठवडे युद्ध चालले होते. या काळात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नुकसान झाले होते. मात्र आता इराण युद्धादरम्यान अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात नष्ट झालेल्या अणुस्थळांची पुनर्बांधणी करत आहे. त्यामुळे इस्रायली अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. इराणचा हा प्रकल्प केवळ त्यांच्या देशासाठीच नाही तर संपूर्ण प्रदेशासाठी आणि अमेरिकेसाठीही घातक ठरू शकतो. त्यामुळे इस्रायल इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत अमेरिका सहभागी होणार का याबाबत ट्रम्प यांना विचारत आहेत.

व्हाईट हाऊसने काय म्हटले ?

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अ‍ॅना केली यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि इराणी सरकारने ऑपरेशन मिडनाईट हॅमरने इराणची अणु क्षमता पूर्णपणे नष्ट केल्याच्या अमेरिकन सरकारच्या दाव्याची पुष्टी केली आहे. आता ट्रम्प यांनी म्हटले आहे की जर इराणने अणुशस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या प्लांटवर हल्ला करू आणि सर्वकाही नष्ट करू.

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...