अमेरिकेतला सर्वात मोठा डान्स शो मुंबईच्या मुलांनी जिंकला!

मुंबई : मुंबईतील ‘द किंग्स’ या 14 जणांच्या हिप-हॉप डान्स ग्रुपने अमेरिकेचा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो जिंकला आहे. ‘द किंग्स’ यंदाच्या ‘द वर्ल्ड ऑफ डान्स’ शोच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. या कार्यक्रमाच्या ट्रॉफीसोबतच ‘द किंग्स’ला एक मिलिअन डॉलर म्हणजेच सुमारे सहा कोटी 93 लाख रुपयांचं पारितोषिकही मिळालं आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक …

अमेरिकेतला सर्वात मोठा डान्स शो मुंबईच्या मुलांनी जिंकला!

मुंबई : मुंबईतील ‘द किंग्स’ या 14 जणांच्या हिप-हॉप डान्स ग्रुपने अमेरिकेचा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो जिंकला आहे. ‘द किंग्स’ यंदाच्या ‘द वर्ल्ड ऑफ डान्स’ शोच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. या कार्यक्रमाच्या ट्रॉफीसोबतच ‘द किंग्स’ला एक मिलिअन डॉलर म्हणजेच सुमारे सहा कोटी 93 लाख रुपयांचं पारितोषिकही मिळालं आहे.

या कार्यक्रमाचे परीक्षक जेनिफर लोपेज, ने यो आणि ड्रेक हॉग यांना ‘द किंग्स’चा अंतिम फेरीतील परफॉर्मन्स खूप आवडला. या तिघांनीही ‘द किंग्स’च्या परफॉर्मन्सनंतर उभं राहून टाळ्या वाजवल्या. गेल्या 5 मे रोजी ‘द वर्ल्ड ऑफ डान्स’ची अंतिम फेरी झाली. यामध्ये ‘द किंग्स’सोबतच इतर देशातील अनेक ग्रुपने आपल्या डान्सने परीक्षकांची मनं जिंकली.


‘द वर्ल्ड ऑफ डान्स’ हा अमेरिकेचा एक रिअॅलिटी डान्स शो आहे. यामध्ये जगभरातील डान्सर्स सहभागी होत असतात. तीन महिन्यांपर्यंत चाललेल्या या रिअॅलिटी डान्स शोमध्ये ‘द किंग्स’ने परीक्षकांच्याच नाही तर प्रेक्षकांच्याही मनावर अधिराज्य गाजवलं. ‘द वर्ल्ड ऑफ डान्स’चं हे तिसरं पर्व आहे. याची सुरुवात 26 फेब्रुवारी 2019 पासून झाली होती.

‘द किंग्स’ हा डान्स ग्रुप मुंबईचा आहे. यामध्ये 14 मुलं आहेत. हे सर्व 17 ते 27 या वयोगटातील आहे. या ग्रुपची सुरुवात 2008 मध्ये मुंबईत झाली. स्ट्रीट डान्सिंगपासून यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या तिसऱ्या पर्वात या डान्स ग्रुपला ओळख मिळाली. ‘द किंग्स’ने यापूर्वी 2015 मध्ये ‘वर्ल्ड हिप-हॉप डान्स चॅम्पिअनशिप’मध्ये तिसरं स्थान पटकावलं होतं.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *