LIVE : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रुपनर शिवसेनेच्या वाटेवर

LIVE : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रुपनर शिवसेनेच्या वाटेवर
Picture

सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर

पंढरपूर : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर, आज दुपारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, शेकापने उमेदवारी कापल्याने रूपनर नाराज, शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांच्या अडचणीत वाढ 

05/10/2019,11:23AM
Picture

आरे वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सरकारवर टीका

05/10/2019,9:23AM
Picture

आरेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा फौजफाटा, नागरिकांना आरेमध्ये जाण्यास मनाई

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मेट्रोसाठी आरेतील वृक्षतोड करण्यात आली. त्यामूळे संतप्त झालेले नागरिक आरेकडे जाऊ नये म्हणून अरेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत नागरिकांना आरेमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

05/10/2019,9:23AM
Picture

कोल्हापुरात आघाडींच्या नेत्यांची बैठक

कोल्हापुरात शरद पवार यांनी आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. पंचशील हॉटेलमध्ये ही बैठक सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही यावेळी उपस्थित आहेत.

05/10/2019,9:16AM
Picture

शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरींच्या प्रचाराला आजपासून सुरुवात

शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार अजय चौधरी आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. यांच्या पहिल्या प्रचार फेरीचा शुभारंभ लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या पवित्र स्थळापासून सुरु होणार आहे.

05/10/2019,9:11AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *