रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (17 मार्च) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर आज (17 मार्च) एकूण चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला …

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (17 मार्च) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर आज (17 मार्च) एकूण चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप-डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते पनवेल 4 तास वाहतूक बंद असणार आहे.

कर्जत स्थानकातील एका झाडाचा अडथळा रेल्वे मार्गावर ठरत असल्याने ते पाडण्याच्या कामासाठी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यानही पुलावर गर्डर बसवण्यात येणार असल्याने दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेच्या सर्व गाड्या उशिराने धावतील.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड वायर आणि सिग्नलसह इतर अन्य कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे धिम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावर एक झाड पाडण्यात येणार आहे. हे काम सकाळी 10.40 ते दुपारी 1.40 पर्यंत केले जाईल. यामुळे ठाणे ते कर्जत लोकस सकाळी 10.48, दुपारी 12.05 आणि कर्जत ते ठाणे दुपारी 1.27 आणि कर्जत ते सीएसएमटी 1.57 ची लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई ते भुसावळ ते मुंबई एक्स्प्रेस आणि एलटीटी ते मनमाड ते एलटीटी गोदावरी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.

हार्बर मार्गावर

कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 4 तास वाहतूक बंद राहणार आहे.

पश्चिम रेल्वे

बोरिवली ते गोरेगाव दरम्यान धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत हा ब्लॉक असेल. त्यामुळे या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर धावतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *