निवडणुका संपल्या, पेट्रोल आणि दुधाच्या किंमती वाढल्या

मुंबई : लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता सर्व सामान्य जनतेला महागाईचा फटका बसयला सुरुवात झाली आहे. रविवारी (19 मे) निवडणुका संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारपासून (20 मे) पेट्रोल आणि दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे सामान्य जनतेकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. देशात पेट्रोलच्या किंमतीत 10 ते 16 पैसांनी वाढ करण्यात आली आहे, तर अमूल कंपनीच्या दुधाच्या …

निवडणुका संपल्या, पेट्रोल आणि दुधाच्या किंमती वाढल्या

मुंबई : लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता सर्व सामान्य जनतेला महागाईचा फटका बसयला सुरुवात झाली आहे. रविवारी (19 मे) निवडणुका संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारपासून (20 मे) पेट्रोल आणि दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे सामान्य जनतेकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

देशात पेट्रोलच्या किंमतीत 10 ते 16 पैसांनी वाढ करण्यात आली आहे, तर अमूल कंपनीच्या दुधाच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अमुलचे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (21 मे) पासून अमूल दुधाच्या किंमतीत प्रति लीटर 2 रुपये वाढवण्यात येत आहे.

अमुलच्या उत्पादनात सातत्याने घट होत असल्याने दिल्ली एनसीआर, महाराष्ट्र आणि इतर राज्यातील दुधाच्या किंमतीत 2 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमूलची 500 मिली दुधाची पिशवी आतापर्यंत 21 रुपयांना मिळत होती. मात्र वाढ दुधाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर ती आता 22 रुपयांना मिळत आहे. तर दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल डिझेलमध्ये 9 पैसे, कोलकातामध्ये 8 पैसे आणि चेन्नईमध्ये 10 पैसे प्रति लीटरने महाग झाले आहे. डिझेलची किंमत दिल्ली आणि कोलकातामध्ये 15 पैसे, मुंबईत आणि चेन्नईमध्ये 16 पैसे प्रति लीटर वाढवण्यात आले आहे.

येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता कमी असून त्यात वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 2 ते 3 रुपयांनी वाढ होण्याची  शक्यता आहे. नुकतेच काही दिवसांपासून तेलाच्या किंमतीत सतत वाढ होत आहे आणि याचाच परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पडला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *