AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतल्या नाल्यांमधून हाजीअलीपर्यंत वाहत गेलेल्या ‘त्या’ मृतदेहाचा चौकशी अहवाल समोर, मृत्यूचं गूढ मात्र कायम

तिथले झाकणही निघालेले नाही, असा महापालिकेच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Mumbai BMC Inquiry report woman dead body drawn from ghatkopar to haji ali)

मुंबईतल्या नाल्यांमधून हाजीअलीपर्यंत वाहत गेलेल्या 'त्या' मृतदेहाचा चौकशी अहवाल समोर, मृत्यूचं गूढ मात्र कायम
| Updated on: Oct 28, 2020 | 2:17 PM
Share

मुंबई : घाटकोपरमधील असल्फा इथून एक महिला गटारातून वाहून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी चौकशीसाठी मुंबई महापालिकेने समिती नेमली होती. या समितीने नुकतंच त्यांचा अहवाल सादर केला आहे. मात्र अहवालात काहीही निष्पन्न न झाल्याची बाब समोर आली आहे. (Mumbai BMC Inquiry report woman dead body drawn from ghatkopar to haji ali)

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 ऑक्टोबरला 32 वर्षीय शीतल दामा ही महिला झाकण उघड्या असलेल्या गटारात पडल्याची शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली होती. यानंतर 4 ऑक्टोबरला तिचा मृतदेह हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला होता.

या प्रकरणी चौकशी अहवालात महिला गटारात पडल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. तसंच जिथं महिला पडल्याचे सांगितले जात होते. तिथले झाकणही निघालेले नाही, असा महापालिकेच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तसेच घटनास्थळावरुन याप्रकरणी सीसीटीव्ही उपलब्ध झाला नाही किंवा एकही प्रत्यक्षदर्शी मिळाला नाही. त्या गटारीचा प्रवाह हा माहीमकडे जातो. पण तो मृतदेह हा हाजीअलीला कसा गेला?  असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

दरम्यान याप्रकरणी मुंबई महापालिका आता अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवणार आहे. त्यामुळे आता शीतल दामा यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. पालिकेच्या अहवालात काहीही समोर न आल्याने पुढील तपास पोलीस करतील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

घाटकोपरच्या असल्फा भागातील गटारातून शितल दामा नावाची एक 32 वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास शितलचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला. असल्फा ते हाजीअली दरम्यान जवळपास 20 ते 22 किमीचं अंतर आहे. एवढ्या लांब नाल्यातून मृतदेह कसा वाहून गेला, असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

हा मृतदेह कुठेही न अडकता एवढ्या लांब अंतरापर्यंत जाणं शक्यच नाही असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकड़ून सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर, महापालिकेनं पर्जन्य जलवाहिन्या, गटारातून वाहणाऱ्या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या जाळ्या आणि ग्रील्स लावल्या आहेत. त्यामुळे महिलेचा मृतदेह वाहून जाऊच शकत नाही, असा दावा पालिकेनं केला होता. (Mumbai BMC Inquiry report woman dead body drawn from ghatkopar to haji ali)

संबंधित बातम्या : 

कसं शक्य आहे? मुंबईतल्या नाल्यांमधून महिलेचा मृतदेह हाजीअलीपर्यंत वाहत गेला

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!