भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली, कोथिंबीरची जुडी केवळ…

नवी मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबीर, मेथी इत्यादी पालेभाज्यांची आवक वाढली आहे. (Navi Mumbai Vegetable Rate Fall)

भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली, कोथिंबीरची जुडी केवळ...
जवळपास 8 महिन्यांनंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक सुरळीत झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 4:02 PM

मुंबई : नवी मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबीर, मेथी इत्यादी पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या भावात घसरण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी 30 ते 40 रुपये प्रति जुडी विकली जाणारी मेथी सध्या केवळ 5 रुपये, तर कोथिंबीरची जुडी 2 ते 5 रुपये इतक्या कमी किमतीत विकली जात आहे. मात्र मालाला हमीभाव मिळत नसल्याने काही शेतकरी प्रतिनिधी यांनी आपला माल बाजार आवारात फेकत असल्याचे चित्र मिळत आहे. (Navi Mumbai Vegetable Rate Fall)

आधीच अवकाळी पावसामुळे शेती पिके खराब झाली होती. इतर फळभाज्यांप्रमाणे पालेभाज्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला. भाजीपाला लवकर नासत असल्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये येण्याआधीच काही माल खराब होत होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मेथी आणि कोथिंबीरचे भाव वधारले होते.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारात मेथी आणि कोथिंबीर साठवण्याचे साधन नसतं. त्यामुळे आणलेला हा माल तात्काळ विकला न गेल्यास उघड्यावर खराब होतो. त्यामुळे मालाची आवक कमी होते कोथिंबीर आणि मेथी 30 ते 40 रुपये जुडी भावाने विकली जात होती.

पण सध्या थंडीची लाट पसरल्यामुळे भाजीपाला पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने, त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत मेथी आणि कोथिंबीरची आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. वाशीच्या भाजीपाला मार्केटमध्ये पुणे, नगर, नाशिक भागातून मेथी आणि कोथिंबीरचा माल दाखल झाला आहे. आवक वाढल्यामुळे मेथीला 5 रुपये, तर कोथिंबीरला 2 ते 5 रुपये प्रतिजुडी भाव मिळत आहे.

बाजार समितीत दोन महिन्यांपूर्वी तब्बल 80 रुपये प्रति जुडी असा कोथिंबीरने उच्चांक गाठला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून कोथिंबीरच्या भावात घसरण होत आहे. बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्च खिशातून भरण्याची वेळ आली आहे. (Navi Mumbai Vegetable Rate Fall)

संबंधित बातम्या : 

Food | थंडीतही शरीरासाठी लाभदायक, व्हिटामिन्सयुक्त मटार खाण्याचे ‘हिवाळी’ फायदे

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.