मुंबईनंतर पनवेल पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पनवेल महानगर पालिकेने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना आणि दुकानदारांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईनंतर पनवेल पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव (Panvel Municipal Corporation) Not Using Mask) दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या दोन हजारांच्या वर गेलेली आहे. आजपर्यंत कामोठे आणि खारघर वगळता उर्वरित भागात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात होते. मात्र, आता दाट लोकवस्तीच्या भागातदेखील रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. लॉकडाऊन शिथील होत असल्यामुळे लोकांचा संचार वाढला आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करुन देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत.

लहान मोठ्या खरेदी करण्यासाठी घरातील एका पेक्षा जास्त सदस्य बाहेर जात आहेत. यामुळे बाहेरच्या लोकांशी संपर्क वाढला आहे. त्यातही काही बेजबाबदार नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. सॅनिटायझरचा वापर करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

ही बाब लक्षात घेऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी चारही प्रभागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना आणि दुकानदारांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून 100 रुपयांचा भुर्दंड आकारण्यात येत आहे. खारघर, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी हे अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून कारवाई करत करत आहेत (Panvel Municipal Corporation).

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून एक परिपत्रक जाहीर केले होते. त्यानुसार, महानगर पालिका हद्दीतील नागरिकाने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालने बंधनकारक केले आहे. मास्क न घातलेल्या व्यक्तीवर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे.

सर्व व्यक्ती ह्या कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी जसे की रस्ता, रुग्णालय, कार्यालय, बाजारपेठ, इत्यादी ठिकाणी जात असल्यास मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.

Panvel Municipal Corporation

संबंधित बातम्या :

Mumbai Local | मुंबई लोकलची संख्या वाढवली, तब्बल 350 लोकल रुळावर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश

Corona | मुंबईत विनामास्क फिरल्यास 1 हजार रुपये दंड, पालिकेचा निर्णय

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *