मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळण्यास उशीर, मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला (Suicide in mantralaya) आहे.

Suicide in mantralaya, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळण्यास उशीर, मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला (Suicide in mantralaya) आहे. नुकतंच एका महिलेने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला (Suicide in mantralaya) आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने मंत्रायलात सरंक्षक जाळी बसवण्यात आल्याने ही महिला (Suicide in mantralaya) बचावली. प्रियांका गुप्ता असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला गेल्या काही दिवसांपासून आरोग्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील मदतीसाठी मंत्रालयात येत होती. मात्र या महिलेला मदत मिळण्यास उशीर झाल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे बोललं जात (Suicide in mantralaya) आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. सध्या ही महिला मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात आहे. तिची कसून चौकशीही सुरु आहे. या महिलेने नेमकी आत्महत्या का केली याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही.

ही महिला उल्हासनगर या ठिकाणी राहते. सध्या महिलेला मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. याआधी देखील अनेकदा मंत्रालयात असे आत्महत्येचे प्रयत्न केलेल्या घटना घडल्या. मात्र, सरंक्षण जाळीमुळे त्यांचे देखील प्राण (Suicide in mantralaya) वाचले.

काही महिन्यांपूर्वी प्रजासत्ताक भारत या पक्षाच्या कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरुन सहाव्या मजल्यावरुन खाली उडी मारली होती. मात्र मंत्रालय इमारत परिसरात सुरक्षेसाठी जाळी बसवण्यात आल्याने, हा कार्यकर्ता त्या जाळीत अडकला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण असं या 41 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

लक्ष्मण चव्हाण हे आपल्या मागण्या घेऊन आले होते. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बालमृत्यू जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी, मंत्री, आमदारांनी शासकीय निवासस्थाने, त्याचबरोबर व्हीव्हीआयपी, शासकीय लाभांचा त्याग करावा. महाराष्ट्रावर  साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे, त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांना मानधन देऊ नये अशा मागण्या लक्ष्मण चव्हाण यांनी (Suicide in mantralaya) केल्या.

आपल्या मागण्यांची विविध पत्रकं लक्ष्मण चव्हाण यांनी वरच्या मजल्यावरुन खाली भिरकावली. त्यानंतर त्यांनी स्वत: खाली उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सुरक्षेला लावलेल्या जाळीत अडकले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *