सारखी ऑर्डर देते म्हणून वेटरचा परदेशी महिलेवर चाकूहल्ला

मुंबई : एका हॉटेलमधील वेटरने परदेशी महिलेवर चाकूने हल्ला केला आहे. ही महिला वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऑर्डर देत असल्याने हा हल्ला वेटरने केला आहे. ही घटना 5 जानेवारीला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास अंधेरीमधील कोशिया सुईट्स येथे घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. निशांत गौडा असं आरोपीचं नाव आहे. अंधेरी जे. बी. […]

सारखी ऑर्डर देते म्हणून वेटरचा परदेशी महिलेवर चाकूहल्ला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : एका हॉटेलमधील वेटरने परदेशी महिलेवर चाकूने हल्ला केला आहे. ही महिला वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऑर्डर देत असल्याने हा हल्ला वेटरने केला आहे. ही घटना 5 जानेवारीला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास अंधेरीमधील कोशिया सुईट्स येथे घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. निशांत गौडा असं आरोपीचं नाव आहे.

अंधेरी जे. बी. नगर येथील कोशिया सुईटस हॉटेलमधील रुम नंबर 204  ही परदेशी महिला थांबली होती. आपल्या लग्नाची वर्षगाठ साजरी करण्यासाठी ही महिला साऊथ आफ्रिकेवरुन भारतात आली होती. यावेळी लग्नाची वर्षागाठ साजरी करत असताना अनेकजण जवळील मित्र पार्टीसाठी हजर झाले होते. तेव्हा कार्यक्रम सुरु असताना तिला अनेक गोष्टींची गरज लागली, तेव्हा तिने वेटरला सांगितले. सुरुवातीला तिने केक आणला होता, काही वेळाने तिने वेटरला प्लेट आणायला सांगितले, यानंतर पाण्याची बॉटल मागवली तसेच पुन्हा केक कापण्यासाठी चाकू मागितला होता. वारंवार ऑर्डर घेऊन वैतागलेल्या वेटरने थेट त्या परदेशी महिलेवर चाकुने हल्ला केला.

आरोपी वेटर निशांत गौडाला पोलिसांनी अटक केली असून, आज अंधेरी कोर्टात हजर केले होते. मात्र त्याला न्यायलयीन कोठडी पाठवण्यात आलं आहे. या झालेल्या सर्व प्रकरावर आम्ही हॉटेलची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण हॉटेल मॅनेजर काही बोलण्यास तयार नव्हते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.