मालिका पाहता-पाहता जेवण महागात, चिकनचा तुकडा थेट अन्ननलिकेत अडकला

मुंबई : टीव्ही पाहताना जेवण करणं ही अनेकांची आवडती सवय असते. पण समोर टीव्हा आणि त्यात जेवणाकडे दुर्लक्ष झालं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण मुंबईतील घाटकोपरमध्ये समोर आलंय. जेवण करताना टीव्हीवर मालिका पाहण्यात दंग झालेल्या एका महिलेच्या घशात चिकनचा तुकडा अडकला. हा तुकडा अन्ननलिकेत गेल्यामुळे महिलेची रवानगी थेट रुग्णालयात करावी लागली. घाटकोपरमध्ये राहणाऱ्या उर्मिला …

dinner while watching TV serial, मालिका पाहता-पाहता जेवण महागात, चिकनचा तुकडा थेट अन्ननलिकेत अडकला

मुंबई : टीव्ही पाहताना जेवण करणं ही अनेकांची आवडती सवय असते. पण समोर टीव्हा आणि त्यात जेवणाकडे दुर्लक्ष झालं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण मुंबईतील घाटकोपरमध्ये समोर आलंय. जेवण करताना टीव्हीवर मालिका पाहण्यात दंग झालेल्या एका महिलेच्या घशात चिकनचा तुकडा अडकला. हा तुकडा अन्ननलिकेत गेल्यामुळे महिलेची रवानगी थेट रुग्णालयात करावी लागली.

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या उर्मिला चव्हाण यांची मालिका पाहणं ही आवडती सवय. मालिका पाहताना बिर्याणीचा बेत होते. मालिका पाहत असताना त्या एवढ्या रमल्या, की तीन सेमीचा चिकनचा तुकडा त्यांच्या घशात आणि त्यानंतर अन्ननलिकेत अडकला. त्यांना श्वास घेण्यासाठीही त्रास होऊ लागला. अखेर रुग्णालयात दाखल करावं लागलं.

उर्मिला यांना कुर्ला कोहिनूर हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. घशात अडकलेले हाड पाहण्यासाठी लगेचच त्यांच्या मानेची आणि छातीची चाचणी केली. सीटी स्कॅनमध्ये अन्ननलिकेला छेद गेल्याचं दिसलं नाही. अखेर 14 तासानंतर तज्ञ डॉक्टरांनी हा तुकडा काढण्यात यश मिळवलं.

कोहिनूर हॉस्पिटलमधील ईएनटी आणि हेड अँड नेक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. संजय हेलाले यांनी ही शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती. कारण, घशात अडकलेले हाड दोन्ही बाजूने टोकदार होते आणि अन्ननलिकेच्या मुखाशी ते आडव्या स्थितीत अडकले होते. एण्डोस्कोपिक मार्गदर्शनाखाली हे हाड चिमट्याने बाहेर काढण्यात आले. ही प्रक्रिया करताना अत्यंत काळजी घेण्यात आली, जेणेकरून अन्ननलिकेला धोका पोहोचू नये.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *