HIV AIDS : भयानक, एका सुईमुळे 10 जणांना HIV ची लागण, आरोग्य विभाग हादरला

HIV AIDS : केरळमधून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका माणसामुळे 10 जणांना HIV सारख्या गंभीर आजाराची लागण झाली आहे. हे प्रकरण काय आहे? कशामुळे घडलं? जाणून घ्या.

HIV AIDS : भयानक, एका सुईमुळे 10 जणांना HIV ची लागण, आरोग्य विभाग हादरला
HIV
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Mar 27, 2025 | 6:49 PM

केरळमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. मलप्पुरम जिल्ह्यात वलंचेरी नगर पालिका क्षेत्रात 10 जणांना HIV ची लागण झाली आहे. या सर्वांना एकाच सुईने इंजेक्शन देण्यात आलं होतं. या 10 जणांमध्ये तीन व्यक्ती अन्य राज्यातील आहेत. बाकी सात केरळचे आहेत. हे सर्व नशेच्या औषधांच इंजेक्शन घेत असल्याच आरोग्य विभागाच्या चौकशीतून समोर आलय. एकाच इंजेक्शनची सुई सर्वांना टोचण्यात आल्यामुळे त्यांच्यात HIV च संक्रमण पसरलं. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

हे प्रकरण मलप्पुरम जिल्ह्यातील वलंचेरी नगर पालिका क्षेत्रातील आहे. आरोग्य विभागाने प्राथमिक चौकशीनंतर सांगितलं की, सगळ्यांना नशेच व्यसन करण्याची सवय होती. यात एक जण HIV संक्रमित होता. त्याने वापरलेली इंजेक्शनची सीरीज अन्य 9 जणांनी नशेसाठी वापरली. आरोग्य विभागाने सांगितलं की, यामध्ये अन्य राज्यातून आलेले तीन अप्रवासी मजूर आहेत.

आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

जानेवारी 2025 मध्ये केरळ एड्स नियंत्रण असोसिएशनने वलंचेरी येथे एक HIV रुग्ण असल्याची पुष्टी केली होती. आरोग्य विभागाने तपास केल्यानंतर समोर आलं की, संक्रमित व्यक्तीने वापरलेली सीरींज अन्य 9 लोकांनी वापरली होती. त्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत.

पुढे काय?

जिल्हा चिकित्सा अधिकारी आर. रेणुका यांनी नशेच्या औषधांच सेवन करणाऱ्यांमध्ये HIV संक्रमण वाढण्याची भिती व्यक्त केली. वलंचेरी येथे HIV ची लागण झालेले 10 जण नशेच्या औषधांचे सेवन करतात. त्यामुळे कुटुंबामध्ये HIV संक्रमण पसरण्याची भिती आहे. आरोग्य विभाग आता विशेष काळजी घेतोय. संक्रमित झालेल्या कुटुंबियांच्या व्यक्तीची आता तपासणी सुरु आहे.