देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ जनेटिक आजार, उपचारासाठी हवेत 16 कोटी
पती-पत्नी बाळाचे प्रेमाने संगोपन करु लागले. बाळ नऊ महिन्याचे झाले इतरांच्या बाळांप्रमाणे बसायला का शिकत नाही, उभे का राहात नाही अशी शंका त्यांच्या मनात आली होती.

आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील एका दाम्पत्याच्या संसाराच्या वेलीवर नुकतेच एक फुल उमलेले. छान गोंडस बाळाच्या कौतूकात हे छोटे कुटुंब रमले. परंतू आपलं बाळ बसत का नाही, स्वत:हून दूध का पित नाही याची काळजी त्याच्या आईला लागली. त्यानंतर ते अनेक डॉक्टरांकडे या बाळाला घेऊन गेले. विजयवाडा आणि गुंटुर येथील डॉक्टरांना या बाळाच्या आजाराचे निदान करता येईना. अखेर बंगळुरु येथील बापिस्तू रुग्णालयात या बाळाच्या आजाराचे निदान करण्यात आले. या बाळाला दुर्मिळ असा स्पाइनल मस्क्यूलर ऍट्रोफी SMA हा आजार असल्याचे अखेर स्पष्ठ झाले. परंतू येथेच दैवाची परीक्षा संपली नव्हती….
गुंटूरमध्ये राहणाऱ्या गायत्री यांचा विवाह राजमुंद्री येथील प्रीतम यांच्याशी साल 2022 मध्ये झाला. त्यांच्या घरी कन्येचा जन्म झाला आणि घरात आनंद ओसंडून वाहू लागला. या गोंडस बाळाचे नाव त्यांनी हितैशी असे ठेवले. पती-पत्नी बाळाचे प्रेमाने संगोपन करु लागले. बाळ नऊ महिन्याचे झाले इतरांच्या बाळांप्रमाणे बसायला का शिकत नाही, उभे का राहात नाही अशी शंका त्यांच्या मनात आली. आपलं गोंडस बाळ स्वत:हून दूध पित नाही. अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतरही निदान होईना. अखेर बंगलुरु येथील बापिस्तू रुग्णालयाती डॉक्टरांनी बाळाला SMA असल्याचे या आजाराचे निदान झाले. हा आजार जनुकीय दोषामुळे होत असून प्रथिन तयार होण्यात दोष झाल्याने पेशी मरत असल्याने स्नायू योग्यप्रकारे कार्य करीत नाहीत. त्यामुळे बाळ चालू किंवा बसू शकत नाही.
पालकांचा क्राऊड फंडींगचा निर्णय – दानशूरांनी खालील खाते क्रमांकावर मदत करावी
देणगी तपशील

Baby Hithaishi Suffered with Rare Disease in Guntur
या दुर्मिळ आजारावर उपचार असल्याचे कळताच पालकांना आनंद झाला. बाळाच्या उपचारासाठी 16 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे ऐकूनच त्यांचा धीरच सुटला आहे. या गोड बाळाच्या ओठांवरील हास्य कायम ठेवण्यासाठी पालकांनी आपलं सर्वस्व दिले तरी ही रक्कम उभारणे शक्य नाही. या दोघा जणांनी आपल्या बाळाच्या उपचारासाठी क्राऊड फंडिंगचा निर्णय घेतला आहे. नऊ महिन्यांच्या बाळासाठी दानशुर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.