5 सुपर पॉवर झाडं, एकजरी लावलं तरी साप घरात सुद्ध डोकावणार नाही, आदिवासी पाड्यांवर हमखास दिसतात
उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर निघण्याच्या घटना घडत असतात. मात्र अशी काही झाडं आहेत, जी झाडं सापांना तुमच्या घरापासून दूर ठेवतात. या झाडांमुळे सापांपासून संरक्षण होतं.

उन्हाळ्याचे दिवस आहेत, यंदाचा उन्हाळा तर अधिक कडक आहे. देशातील टॉप टेन उष्ण शहरांमध्ये पहिल्या चार क्रमांकांवर महाराष्ट्रातील शहरांचा समावेश आहे. उन्हाळ्यामध्ये जमीन तापते, त्यामुळे साप हे बिळातून बाहेर पडतात. साप हे थंड रक्ताचे प्राणी असतात त्यामुळे ते आपलं तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. अशावेळी ते निवाऱ्यासाठी थंड आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेत असतात. सापांचा हा शोध सुरू असतानाच ते तुमच्या घरात घुसण्याची देखील शक्यता वाढते. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये तुम्हाला अनेकदा आपल्या घरात किंवा परिसरामध्ये साप आल्याचं पहायला मिळतं. या काळात सर्पदंशाच्या घटना देखील वाढतात. अशावेळी काळजी घेणं गरजेचं असतं. तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, त्याची माहिती तुमच्या जवळच्या सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करतील, तसेच त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका, ते तुमच्या जीवावर बेतू शकतं.
आज आपण अशा काही झाडांची माहिती जाणून घेणार आहोत, जी झाडं सापांना घरात घुसण्यास प्रतिबंध करतात, या झाडांमध्ये असे काही विशिष्ट गुणधर्म असतात, त्यामुळे साप घरात येत नाहीत. तुम्ही जर कधी आदिवासी पाड्यांमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला ही झाडं पहायला मिळतात. साप घरात येऊ नये, म्हणून ही झाडं लावली जातात.
वेखंड – वेखंड हे एक छोटसं झाड आहे. मात्र याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप हे झाडं जिथे असेल तेवढ्या परिसरात कुठे आसपास देखील फिरकत नाही.
रान तुळस – रान तुळशीला तीव्र वास असतो, ही तुळस आपण घरी लावतो, त्या तुळशीपेक्षा थोडी वेगळी असते, तसेच तिच्या पानाची रचना देखील वेगळी असते. या तुळशीची पानं लांब असतात. तसेच ही तुळस उंच वाढते. मात्र या तुळशीच्या पानांना जो तीव्र वास असतो, त्यामुळे साप घरात येत नाहीत.
सर्पगंधा – सर्पगंधा ही वनस्पती देखील सापांवर रामबाण उपाय आहे, जिथे सर्पगंधा वनस्पती असते तिथे साप येत नाहीत.
अफुमारी – अफुमारी हा एक विशिष्ट प्रकारचा वेल आहे, याचे अनेक आयुर्वेदिक उपयोग देखील आहेत. याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे आणि वासामुळे साप घरात प्रवेश करत नाहीत.
मोह – मोह वृक्षाच्या सालीला विशिष्ट वास असतो, जर या झाडाची साल घरात ठेवली तर साप घरात प्रवेश करत नाहीत, असं म्हटलं जातं.