AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! महिलेला पहिले बांधले, निर्वस्त्र केलं अन्… प्रकरण ऐकून पोलिसही हादरले

बंगळुरूमध्ये कर्ज आणि व्याज न भरल्यामुळे एका महिलेला कथितपणे अपहरण करून निर्वस्त्र करण्यात आले. त्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. आरोपींनी तिचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी महिलेला शोधून काढले आणि रेश्मा बानू, नाजत आणि सुहेल यांना अटक केली आहे.

धक्कादायक! महिलेला पहिले बांधले, निर्वस्त्र केलं अन्... प्रकरण ऐकून पोलिसही हादरले
सांकेतिक फोटोImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 05, 2026 | 9:28 AM
Share

तुम्ही कर्ज वसुलीबाबत असे अनेक प्रसंग ऐकले किंवा पाहिले असतील, जिथे खाजगी कंपन्या किंवा अॅपशी संबंधित लोक कर्जदारांसोबत मारहाण करतात आणि त्यांना धमकावतात. पण कर्नाटकमधून समोर आलेले हे प्रकरण त्याहूनही एक पाऊव पुढे आहे. हे प्रकरण ऐकून पोलिसही हादरले. बंगळुरूमध्ये कर्जाची रक्कम आणि व्याज न भरल्यामुळे एका महिलेला कथितपणे अपहरण करून निर्वस्त्र करण्यात आले. त्यानंतर तिच्यासोबत मारहाण करण्यात आली.

समोर आलेल्या माहितीनुसार तीन जणांनी, ज्यात दोन महिलांचा समावेश आहे ही घटना घडवली. आरोपींनी महिलेचा निर्वस्त्र अवस्थेत व्हिडिओही बनवला आणि पैसे न भरल्यास तो व्हायरल करण्याची धमकी दिली. हे संपूर्ण प्रकरण तेव्हा समोर आला, जेव्हा पीडितेच्या आईने चंद्रालेआउट पोलिस स्टेशनमध्ये तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. पोलिसांच्या मते, महिलेने सुमारे दोन वर्षांपूर्वी आरोपी रेश्मा बानूकडून १ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर तिने रेश्मामार्फत आरोपी नाजतकडून आणखी ५० हजार रुपये कर्ज घेतले होते.

वाचा: तुकाराम मुंढेंची धडाधड कारवाई… अखेर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर; काय म्हणाले पवार?

पोलिसांनी काय सांगितले

पोलिसांच्या मते, आर्थिक अडचणींमुळे महिलेने सहा महिन्यांपासून व्याज आणि दोन महिन्यांपासून हप्ता भरणे बंद केले होते. त्यानंतर तिने रेश्माचा नंबर ब्लॉक केला आणि आपल्या आईच्या घरी गेली. पोलिसांनी सांगितले की, नाजतने कथितपणे महिलेला नोकरी देण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले. तिथे रेश्मा आणि तिचा पती सुहेलही पोहोचले. आरोप आहे की तिघांनीही महिलेसोबत मारहाण केली.

आरोपी ताब्यात

आरोप आहे की महिलेवर चाकूने हल्ला केल्यानंतर तिला जबरदस्तीने ऑटो रिक्षात बसवून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिला कुंबलगोड्डूजवळील एका घरात नेण्यात आले, जिथे तिला कथितपणे ओलीस ठेवून ठेवण्यात आले आणि तिच्यासोबत मारहाण करण्यात आली. बेपत्ता होण्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महिलेला शोधून काढले. त्यानंतर रेश्मा बानू, नाजत आणि सुहेल यांना अटक करण्यात आली. चंद्रालेआउट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील चौकशी करत आहेत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?