AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल गेमची सवय ठरली जीवघेणी, पॉप्युलर गेम खेळताना गेले मुलाचे प्राण

मोबाईल गेमच्या व्यसनाने लहानमुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहेत, त्यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे, आता एका मुलाचा मोबाईलचा गेम खेळताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाईल गेमची सवय ठरली जीवघेणी, पॉप्युलर गेम खेळताना गेले मुलाचे प्राण
Mobile phone addiction
| Updated on: Oct 17, 2025 | 4:58 PM
Share

लहान मुलांना मोबाईल गेमचे इतके वेड लागले आहे की पालकांना त्यांचे वेड कसे सोडवावे याचे कोडे पडले आहे. त्यामुळे आता पालकांना मोबाईल नकोसा झाला आहे. परंतू मोबाईल फोनच्या वेडातून एका मुलाचे प्राण गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने मोबाईल गेमिंगच्या व्यसनावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कारण एका १३ वर्षांच्या मुलाचा कथितपणे फ्री फायर गेम खेळताना मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे मोबाईलच्या व्यसनावर आणि लहान मुलांना मोबाईल द्यावा की नाही यावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. येथे एका मुलाचा फ्री फायर गेम खेळताना मृत्यू झाला आहे.तज्ज्ञांच्या मते हे ‘सडन गेम डेथ’चे प्रकरण असल्याचे म्हटले आहे.

‘सडन गेम डेथ’ म्हणजे काय ?

सडन गेम डेथ प्रकरण म्हणजे हे असे प्रकरण असते. ज्यात सातत्याने बराच काळ गेळ खेळताना अचानक त्यानंतर लोकांचा मृत्यू होतो. चला तर नेमके हे प्रकरण काय आहे हे पाहूयात..

गेम खेळताना झाला मृत्यू

मीडियातील बातमीनुसार गेम खेळताना हा मुलगा बेडवर झोपला होता. घरातल्यांना आधी वाटले हा झोपला आहे म्हणून त्याच्या कुटुंबियांनी त्याला उठवले नाही. काही वेळानंतर जेव्हा वारंवार जागे केल्यानंतरही तो उठला नाही तेव्हा मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर परिसरात घबराट पसरली. गेल्या काही वर्षांपासून टीनेएजर पिढीत मोबाईल गेमिंग खूपच प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे सतत मोबाईल पाहात राहिल्याने झोपचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हे का होते ?

वैद्यकीय संशोधनानूसार हे समोर आले आहे की अनेक तास न थांबता गेमिंग केल्याने आरोग्यावर प्रचंड गंभीर परिणाम होत अनेक आजार होत आहे. सातत्याने एकाच स्थिती बसल्याने फुप्फुसात रक्त्याच्या गाठी जमू लागतात. गेम खेळताना मेंदूवर सातत्याने तणाव आल्याने हार्टबिट्स असमान्य होणे आणि ब्रेन हॅमरेजचा धोकाही निर्माण होत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे काय ?

तज्ज्ञांच्या म्हणणे आहे की सडन गेमर डेथ प्रकरणात कोणतीही जखमी होत नाही. परंतू यात मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव होतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन आणि अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार ही एक स्थिती इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरशी जोडलेली आहे. ज्यात गेमिंगची सवय मानसिक आरोग्य आणि पॉश्चर आणि हार्टच्या एक्टीव्हीटीला प्रभावित करते. १९८२ नंतर आतापर्यंत जगभरात सडन गेम डेथच्या २४ केस रिपोर्ट झाल्या आहेत. अशा प्रकरणात मरणाऱ्यांचे वय ११ ते ४० वयाच्या दरम्यान होते. यातील बहुतांशी प्रकरणे सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशियातील आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...