AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विमानतळावर मोठी दुर्घटना, दोन विमान…

दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. थेट दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले गेले. त्यानंतर प्रवाशांना तातडीने विमानातून बाहेर काढण्यात आले.

मोठी बातमी! विमानतळावर मोठी दुर्घटना, दोन विमान...
दिल्ली विमानतळावर दुर्घटनाImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 16, 2026 | 5:51 PM
Share

दिल्ली विमानतळावर एक मोठा विमान अपघात होताहोता टळला आहे. दोन विमानांच्या पंखांची टक्कर झाली आहे. या धडकेनंतर, सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. स्पाईसजेट आणि अकासा एअरच्या विमानांच्या पंखांची ही टक्कर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अकासा एअरचे विमान दिल्लीहून हैदराबादला जात होते.

दिल्ली विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला. स्पाइसजेट आणि आकासा एअर या दोन विमानांच्या पंखांमध्ये टक्कर झाल्याने गोंधळ झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही. घटना टर्मिनल १ जवळ घडली. आकासा एअरचे विमान (QP 1406) दिल्लीहून हैदराबादकडे जाण्यासाठी पुशबॅकनंतर तयार उभे होते. त्याच वेळी लेहहून आलेले स्पाइसजेटचे Boeing 737-700 विमान टॅक्सी करत होते. टॅक्सींगच्या दरम्यान स्पाइसजेटच्या विमानाने आकासा एअरच्या विमानाला धक्का दिला.

नुकसान किती झाले?

-स्पाइसजेटच्या विमानाच्या उजव्या पंखाचा विंगलेट पूर्णपणे खराब झाला.

-आकासा एअरच्या विमानाच्या डाव्या हॉरिजॉन्टल स्टेबलाइजर ला नुकसान पोहोचले.

-दोन्ही विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले.

कंपन्यांचे स्पष्टीकरण

स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले, “आमचे B737-700 विमान टॅक्सी करत असताना दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाशी टक्कर झाली. यामुळे आमच्या विमानाच्या उजव्या पंखाचा थोडा झुकला आहे. विमान दिल्लीतच रोखण्यात आले आहे.”

आकासा एअरच्या प्रवक्त्याने म्हटले, “दिल्ली ते हैदराबाद फ्लाइट QP 1406 विमानतळावर उभी असताना दुसऱ्या विमानाने धक्का दिला. उड्डाण रद्द करून विमान पुन्हा पार्किंग बेमध्ये आणण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित आहेत. आम्ही प्रवाशांना दुसऱ्या विमानाने हैदराबादला पाठवण्याची व्यवस्था करत आहोत.”

सध्याची स्थिती

दिल्ली विमानतळ प्रशासन आणि दोन्ही एअरलाइन्सने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. दोन्ही विमानांच्या तांत्रिक तपासणीसाठी तज्ज्ञांची टीम बोलावण्यात आली आहे. ही घटना विमानतळावरील ग्राउंड ऑपरेशन्स आणि टॅक्सींग प्रक्रियेदरम्यान घडली असून, त्यामागील कारणे शोधण्यात येत आहेत. कोणतीही जीवितहानी न झाल्याने ही घटना मोठ्या अपघातापासून वाचली, मात्र दोन्ही विमानांना मोठे नुकसान झाल्याने उड्डाण वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?